शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय भरतीसाठी महापोर्टलची ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांची डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:34 IST

शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे...

ठळक मुद्देमहापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार

प्रशांत ननवरे - बारामती :  राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ही प्रक्रिया केली जाते. शासनाच्या सर्वच विभागाच्या परीक्षा या महापोर्टलवर घेतल्या जात आहेत. मानवी हस्तक्षेप टाळावा, परीक्षा वेळेवर लवकर पार पाडावी आदी हेतूने परीक्षा देण्यासाठी वापर होणारी महापोर्टलची पद्धत   विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती सुरू आहे. मात्र, महापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. एकाच पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला संगणकाच्या कमी उपलब्धतेमुळे वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी देखील जातो. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. त्यातून काहींच्या वाट्याला सोपा तर काहींच्या वाट्याला अवघड पेपर येतो. त्यावर परीक्षेची गुणवत्ता ठरली जाते. परिणामी विद्यार्थी या  पद्धतीमुळे नाखुश आहे. शासकीय परीक्षा खासगी सायबर कॅफेत घेतली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी सामुहिक कॉपी प्रकार वाढण्याची भीती विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार होत असल्याची विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एकप्रकारे हायटेक कॉपीचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी या पद्धतीमुळे निराश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू केलेल्या महापोर्टलद्वारे खासगी सायबर केंद्रावर परीक्षा घेत आहे. या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे गैरप्रकार होण्याची भीती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशिवाय होणाऱ्या परीक्षा या पोर्टलवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे  एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर स्वायत्त मंडळ निर्माण करून परीक्षा घ्याव्यात. शासनाने पूर्वी  प्रमाणेच आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी जोर धरत आहे. .......* पूर्वीचीच पद्धत होती बरी : विद्यार्थ्यांच्या भावनापूर्वी ऑफलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण, त्याने सोडविलेले प्रश्न आदी माहिती मिळत असे. त्यामुळे तुलनेने आॅफलाईन पद्धत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शी होती. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात त्यांच्या उत्तर पत्रिका पुरावा स्वरूपात सादर करणे शक्य होते. मात्र, महापोर्टलमुळे परीक्षेचा कोणताही पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती राहत नाही. न्यायालयात जाण्यासाठी असणारा मूळ आधार हरविल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.......महापोर्टलमध्ये संगणकावर शुल्काची झालेली वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. शासनाच्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय परीक्षा नवीन पद्धतीद्वारे घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका बनविणे, परीक्षा केंद्र सुचविणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपसणे, निकाल लावणे ही सर्व कामे महापोर्टल करीत आहे. .........

टॅग्स :Baramatiबारामतीonlineऑनलाइन