शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आयटीआय फुल, प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:45 IST

 राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश जवळपास फुल झाले आहेत. आतापर्यंत ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रवेशासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत.

पुणे   राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश जवळपास फुल झाले आहेत. आतापर्यंत ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रवेशासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत पहिल्यांदाच आयटीआयमध्ये एवढे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय आयटीआयवर विद्यार्थ्यांच्या उड्या पडल्याचे दिसते.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व खासगी ‘आयटीआय’मधील प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहेत. ही प्रक्रिया दि. १ जूनपासून सुरू झाली आहे. राज्यात एकूण ४१७ शासकीय व ४९१ खासगी आयटीआय आहेत. शासकीय संस्थांमध्ये एकूण ९४२४८ प्रवेश क्षमता आहे. दोन्ही संस्थांमधील प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या शासकीय संस्थांमधील समुपदेशन फेरी असून, ही प्रक्रिया दि. १८ आॅगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. तर खासगी संस्थांची संस्थास्तरावरील प्रवेशप्रक्रिया दि. ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. आतापर्यंत शासकीय संस्थांमध्ये ९१ हजार ११७ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या प्रवेशात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत एकूण प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश झाले असून, आतापर्यंतची हे विक्रमी प्रवेश असल्याची माहिती संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.आयटीआयमध्ये प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आले होते. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. शासकीय संस्थांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात. त्यामुळे पुढील दोन दिवसांनंतर खासगी आयटीआयमधील प्रवेश वाढतील. ही प्रक्रिया दि. ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशाची संधी आहे. शासकीयप्रमाणे खासगी संस्थांमधील प्रवेशही या वर्षी काही प्रमाणात वाढतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षण