शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांच्या शुल्कात वाढ , वीस वर्षांनंतर वाढ करण्याचा शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 06:40 IST

शासकीय ग्रंथालयांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किमती आणि अपुरी व्यवस्था यामुळे वीस वर्षांनंतर शासकीय ग्रंथालयांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे : शासकीय ग्रंथालयांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किमती आणि अपुरी व्यवस्था यामुळे वीस वर्षांनंतर शासकीय ग्रंथालयांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सभासदांना आता दोन वर्षांसाठी एकशे दहा रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून नवीन शुल्क रचनेची आकारणी होणार आहे. भाषादिनी ग्रंथपालांना ही अनोखी भेट मिळाली आहे.ग्रंथालयांचे वैयक्तिक सभासद व संस्था सभासदांच्या अनामत रक्कम तसेच प्रवेश शुल्कामध्ये १९९८ पासून वाढ झालेली नाही. गेल्या वीस वर्षांमध्ये पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत. ग्रंथांच्या वाढत्या किमतींमुळे सभासद संख्येच्या प्रमाणात ग्रंथांची खरेदी करता येत नसल्याने ग्रंथ अपुरे पडतात. ग्रंथालयांची सोय व ग्रंथालयांचे कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी सभासद संख्या मर्यादित ठेवावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारी विभागीय ग्रंथालये व जिल्हा ग्रंथालयांच्या वैयक्तिक सभासद व संस्था सभासदांची अनामत रक्कम आणि प्रवेश शुल्क रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.५०० रुपये : सध्या जिल्हा आणि विभागीय ग्रंथालयांची वैयक्तिक सभासदांसाठी अनामत रक्कम शंभर रुपये आहे तर नोंदणीकृत संस्थेसाठी पाचशे रुपये आहे.२५० रुपये : वैयक्तिक सभासदांना दोन वर्षांसाठी प्रवेश शुल्क वीस रुपये, तर संस्थेसाठी दीडशे रुपये आहे.३५ जिल्हा, ६ विभागीय ग्रंथालय : राज्यात सरकारची ३५ जिल्हा आणि ६ विभागीय ग्रंथालय आहेत. दापोली येथे बाबासाहेब ग्रंथालय आहे. मुंबई येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय हे या ग्रंथालयांची शिखर संस्था आहे.२५०० रुपये : दि. १ एप्रिलपासून वैयक्तिक सभासदांसाठी अनामत रक्कम पाचशे रुपये, तर संस्थेसाठी अडीच हजार रुपये असणार आहे.वैयक्तिक सभासदांना प्रवेश शुल्क दोन वर्षांसाठी एकशे दहा रुपये, तर संस्थेसाठी ७७५ रुपये असेल, असा अध्यादेश सरकारने काढला आहे. दोन वर्षांनी सभासदत्व नूतनीकरण करण्यात यावे, मूळ कार्ड हरवल्यास दहा रुपये शुल्क आकारावे, ही सेवा देण्यास कार्यालय प्रमुख जबाबदार राहील तसेच सुधारित रक्कम ग्रंथालयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे