वानवडीतील संविधान चौक येथे वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार नाकाबंदी करण्यात आली आहे.
या ठिकाणाहून फक्त वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडलेले नागरिक, सेवक, पार्सल सेवा देणारे कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सोडत आहेत. पोलीस मित्र युवक या ठिकाणी पोलिसांना मदतीचा हात देऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.
विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर वानवडी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यांवर काही मोजकी वाहने सोडल्यास रस्ते शांत झाले आहेत. नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण जमाव करुन थांबणे टाळावे या दृष्टीने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फायदा कितपत होईल हे येणाऱ्या दिवसांतच समजून येईल.
फोटो : संविधान चौकात करण्यात आलेली नाकाबंदी.