शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'तो' नमस्कार दाभोलकरांच्या जिवावर बेतला; हत्येचा घटनाक्रम उलगडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 22:06 IST

डाॅ. दाभोळकर यांच्या विषयी फारशी माहिती नव्हती. आपण ज्यांना मारत आहोत ही तीच व्यक्ती आहे का असा मनात प्रश्न उपस्थित झाला होता.

पुणे- डाॅ. दाभोलकर यांच्या विषयी फारशी माहिती नव्हती. आपण ज्यांना मारत आहोत हे दाभोलकरच आहेत का असा प्रश्न शरदाच्या मनात आला होता. मात्र एका व्यक्तीने दाभोलकरांना सुप्रभातच्या शुभेच्छा दिल्यानंतर शरदचा टार्गेट सेट झाला. त्यानंतर त्याने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी सचिन अंधुरे हा औरंगाबादहून त्याच दिवशी पुण्यात दाखल झाला होता. तर शरद कळसकर हा पुण्यात दाभोलकरांच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवून होता. संशय येऊ नये म्हणून दोघांनीही स्पोर्टस ट्रॅक सूट घातला होता. ठरल्याप्रमाणे दोघेही दाभोलकर यांचा पाठलाग करत होते. हत्येची जागा ही पूर्वनिश्चित केली होती. पुण्यात २० आॅगस्ट २०१३ रोजी पहाटे नेहमीप्रमाणे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी आले होते. त्यावेळी दोघेही त्यांच्या मागावर होते, त्यांनी दाभोलकरांना शिंदे पुलावर गाठलं. मात्र आपण ज्यांचा खून करणार आहोत ते नेमके दाभोलकर आहेत का ? असा प्रश्न अचानक शरदच्या मनात आल्यानंतर तो काहीसा संभ्रमात पडला होता. नेमका त्याच वेळी सकाळी व्यायामासाठी आलेल्या एका व्यक्तीने दाभोलकरांना नावाने हाक मारून नमस्कार केला. त्यानंतर हेच दाभोलकर आहेत, याची शरदला खात्री पटली. शरदने लागलीच पिस्तूल काढून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांची हत्या झाल्याचं तपासात पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास एटीएस आणि सीबीआय संयुक्तरीत्या करत आहेत.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर