शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिवनेरीवर तान्हुल्या शिवबाचे सुवर्णालंकृत शिल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 00:50 IST

शिवजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण : पारंपरिक पाळण्यात ठेवले जाणार शिल्प

जुन्नर : बालशिवबाची सोनपावले सर्वप्रथम ज्या भूमीवर बागडली, बालशिवबासाठी राजमाता जिजाऊंनी गायलेल्या अंगाईगीताचे शब्दसूर जिथे झंकारले, त्या किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शासकीय शिवजन्मोत्सव सोहळ्यात या वर्षी तान्हुल्या शिवबाचे नवीन, आकर्षक, सुवर्णांलकृत शिल्प या वर्षीच्या शिवजन्म सोहळ्यासाठी पारंपरिक पद्धतीने पाळण्यात झुलणार आहे. शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी स्वखर्चाने हे शिल्प बनविले असून, या वर्षीच्या शिवजन्म सोहळ्यात प्रथमच पारंपरिक पाळण्यात हे तान्हुल्या शिवबाचे शिल्प ठेवण्यात येणार आहेत.

रवींद्र काजळे हे शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी हे शिल्प शासनाकडे सुपूर्त करणार आहेत. नाशिक येथील वयोवृद्ध शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी हे शिल्प बनवले आहे. यासाठी शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार दीपक सोनार यांच्या संकल्पनेतून हे शिल्प साकारण्यात आले आहे.त्यावर खास बालरूपाला शोभेल असे कानातील मोत्याचे सोन्याचे डूल, जीवती, चांदीच्या मनगट्या, कंबरेची साखळी, तांब्याचे वाळे असे शिवकालीन दागिने पुण्यातील काजळे ज्वेलर्सचे संजय काजळे यांनी बनविले आहेत. बाल शिवबासाठी ऐतिहासिक धाटणीचा आकर्षक अंगरखा रेवती काजळे यांनीदेखील तयार केला आहे. या शिल्पासाठी किती खर्च आला, हे सांगण्यास मात्र काजळे यांनी नकार दिला. शिवछत्रपतींच्या शिल्पाचे मोल होणार नाही, असे त्यांनी सांगितले.रवींद्र काजळे यांनी सन २००१ मध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी खास शिवकालीन धाटणीचा पाळणा शासनाकडे सुपूर्त केला होता. तुळजाभवानीचा पलंग बनविणाऱ्या ठाकूर बंधूंकडून काजळे यांनी शिसमचा पाळणा बनवून घेतला होता. त्यासाठी लागणारे लाकूडदेखील नेसरी येथून आणण्यात आले होते.

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणे