पुणे : सनसिटी रस्त्यावरील शिवसागर सिटी सोसायटीत हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाला उजाळा देण्यात आला. सोसायटीतीलच रहिवाशांनी एकत्रित येऊन निर्मिती केलेला ‘भूलेबिसरे गीत’ हा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. परिसरातील नागरिकांना त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुमारे २ हजार रहिवाशांच्या या सोसायटीत अनेक कलावंतांचा रहिवास आहे. त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची निर्मिती केली. सोसायटीतच हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सन १९६० ते ७० या दशकातील अनेक गाजलेली गाणी यात सादर करण्यात आली.अश्विनी पाटील, राजश्री इनामदार, प्राजक्ता एकबोटे, स्मिता खर्शीकर, स्नेहल आपटे, स्वाती गोळे, वैदेही फडके, दत्तात्रय सुतार, महेश पाटील, प्रमोद अग्निहोत्री, संदीप शहा, संजील खर्शीकर, विश्वास मिरजगावकर, मधुरा पाटील, निवेदिता पाटील, दीया साटले यांनी यात सहभाग घेतला.गिरिजा इनामदार हिने संवादिनीवर गाणे सादर केले. गायकांना संजीव खर्शीकर (संवादिनी), संजय पारखी (तबला) प्रतीक आपटे (सिंथेसायझर) साथ केली. मंगेश शिर्के यांनी मेंडोलिन, राजेंद्र थिगळे यांनी बेंजो वादन केले. सुनील दिंडोकर, स्मिता खर्शीकर, स्नेहल आपटे यांनी निवेदन केले. राजेंद्र थिगळे व व्यवस्थापन आशुतोष पेशवे यांनी नियोजन केले. (प्रतिनिधी)
अनुभवला संगीताचा सुवर्णकाळ
By admin | Updated: February 17, 2017 05:12 IST