सराईत सोनसाखळी चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:41+5:302021-06-09T04:12:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करून सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ ...

Gold chain thieves arrested in Sarai | सराईत सोनसाखळी चोरट्यांना अटक

सराईत सोनसाखळी चोरट्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करून सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले आहे.

दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनील साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे सराफ सम्राट हुकूमसिंग भाटी याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरणारे चोरटे हडपसर परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दीपक व मुकेश यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी एप्रिल महिन्यात दौंड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ सोनसाखळी चोरी आणि एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला. दोघांविरुद्ध तब्बल १६ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे हा हडपसर येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात ब-याच दिवसांपासून फरार होता.

Web Title: Gold chain thieves arrested in Sarai