शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘गोखले पॉज’... आज विक्रमने घेतलेला आयुष्यातील असा पॉज आहे की, तो कधीच बोलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 07:50 IST

आज विक्रमने घेतलेला आयुष्यातील असा पॉज आहे की, त्यानंतर तो बोलणारच नाही; आणि ही गोष्ट अतिशय असहनीय आहे...

आशा काळे, अभिनेत्री

एका नाटकामध्ये माझ्यासमोरील नायकाने त्याच्या संवादात मोठा पॉज घेतला होता. तो खूप वेळ असल्याने मला वाटलं बहुधा तो संवाद विसरला असेल म्हणून मी माझा पुढचा संवाद म्हणून टाकला. त्यानंतर त्या अभिनेत्याने मला विचारलं, ‘मी पॉज घेतला होता. तू लगेच का तुझा पुढचा संवाद म्हटलास?’ त्यावर मी चटकन म्हटलं,  ‘अच्छा तू ‘विक्रम गोखले पॉज’ घेण्याचा प्रयत्न करत होतास तर!’ ही गोष्ट कळली तेव्हा विक्रम म्हणाला, ‘बेबी, तू माझी चेष्टा करतेस का गं...’ मी म्हटलं, ‘मी कायं केलं?’  तो म्हणाला, ‘‘विक्रम गोखले पॉज’ हे काय नवं...’ मी म्हणाले, ‘आहेच की मग तुझा पॉज असा युनिक. तुझा संवाद जितका जबरदस्त असतो आणि त्यामध्ये तू घेतलेला पॉज हा तर त्याहून जास्त बोलका होतो.  खरं सांगू विक्रम, कोणत्याही गोष्टीची कॉपी होऊ शकते, पण तुझ्या त्या पॉजची कॉपी होऊ शकत नाही. कारण तो ‘विक्रम गोखले पॉज’ आहे. त्याची कुणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याची माती होते.’ ...पण आज विक्रमने घेतलेला आयुष्यातील असा पॉज आहे की, त्यानंतर तो बोलणारच नाही; आणि ही गोष्ट अतिशय असहनीय आहे.२३ नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. त्याचदिवशी मला विक्रम अत्यवस्थ असल्याची बातमी कळली आणि मी प्रचंड अस्वस्थ झाले. कोल्हापुरात असल्यानं आई अंबाबाई मंदिरात गेले आणि प्रार्थना केली. माझा वाढदिवस अजिबात साजरा केला नाही. गोडधोड वर्ज्य केलं. माझा मोठा भाऊ अनिल काळे आणि विक्रम हे दोघे कॉलेजमध्ये बॅॅचमेट होते. अनिलबरोबरच तो घरी आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी विक्रम शिकत होता. मी तर शाळेतच होते. बाबांची बदली कोल्हापूरला झाली आणि मी आई-बाबांबरोबर कोल्हापूरला गेले. तिथे माझं नाटकातलं करिअर सुरू झालं आणि विक्रमचंही पुण्यात सुरू झालं. विक्रमचे वडील चंद्रकात गोखले आणि काका लालजी गोखले यांचा मोठा वारसा त्याच्याकडे होता. त्यामुळं त्याची थेट व्यावसायिक रंगभूमीवरच एन्ट्री झाली. माझं-त्याचं एकत्रित पहिलं नाटकं म्हणजे ‘मी वाहतो दुर्वांची जोडी’. त्या नाटकाचे आम्ही शेकडो प्रयोग केले. त्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकानं तर रसिकांनी आम्हाला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याचे नऊशेहून अधिक प्रयोग आम्ही केले. मला बेबी म्हणणारा कोणीच नाही याचं मोठं दु:ख

आई-वडील आणि अनिल मला बेबी म्हणायचे. विक्रमही मला बेबीच म्हणायचा. काही दिवसांपूर्वी भाऊ गेला, त्यानंतर आई-वडील गेले. काही दिवसांपूर्वी पतीही गेले. त्यावेळी बेबी म्हणून मला हाक मारत धीर देणारा फक्त विक्रम होता. आता विक्रमही नाही. हे दु:ख मोठं आहे.    (शब्दांकन : दीपक होमकर)

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखले