शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 20:20 IST

सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंयुक्त बैठकीत निर्णय, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पुर्णपणे बंद करण्याबाबत आयुक्तां आश्वासन सध्या आलेल्या ११ गावांचा सांडपाणी निर्मुलन आराखडा तयार

पुणे: फुरसुंगी, उरूळी देवाची येथील कचरा डेपोत जाणारा कचरा कमी करणार व ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तिथे जाणारा कचरा पुर्णपणे बंदच करणार असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या वारसांना महापालिकेत येत्या दोन महिन्यात नोकरी देण्याबाबत व अन्य काही महत्वाच्या गोष्टींबाबत शनिवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, तसेच अन्य अधिकारी व फुरसुंगी, उरूळी देवाची येथील प्रमुख ग्रामस्थ, विसर्जीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी बैठकीला उपस्थित होते. शिवतारे यांनी नंतर बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पुर्णपणे बंद करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे. समाविष्ट गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमीकमी करत डिसेंबर अखेर डेपोत कचरा आणण्याचे पुर्णपणे थांबवले जाईल. यासाठीचे वेळापत्रकच आयुक्तांनी बैठकीत सादर केले असून त्याप्रमाणे काम केले जाईल असे शिवतारे म्हणाले.डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे एकूण ५७ वारस आहेत. त्यातील ४० जणांच्या वारसा हक्काबाबत काहीच संदेह नाही. त्यांना त्वरीत महापालिकेच्या सेवेत घेण्यात येईल. उर्वरित १७ जणांनी न्यायालयाकडून तेच वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणल्यानंतर त्यांनाही सेवेत घेतले जाईल. फुरसुंगी व उरूळी देवाचीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून ७२ कोटी रूपयांची पाणी योजना राबवली जात आहे. आता ही गावे महापालिकेत आल्यामुळे त्यांना माणशी १५० लिटरप्रमाणे पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी योजनेत काही बदल करावे लागतील. त्याबाबत प्राधिकरण व महापालिका यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी व काय बदल करावे लागतील त्याची चर्चा करावी अशी सुचना केली असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली.सध्या आलेल्या ११ गावांचा सांडपाणी निर्मुलन आराखडा तयार केला जात आहे. आणखी काही गावे पुढच्या तीन वर्षात महापालिकेत येणार आहे. आराखडा करताना याही गावांना त्यात सहभागी करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. काही गावांमध्ये तातडीचे कामे करणे गरजेचे आहे. गंगासागर येथे १६ ते १७ गल्ल्यांमध्ये बिकट स्थिती झाली आहे. तिथे त्वरीत रस्ते करावेत. प्रमुख रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील व पावसाळा संपल्यानंतर कामही सुरू केले जाईल. राज्य सरकारने या गावांसाठी विशेष निधी दिला नाही, मात्र मुख्यमंत्री स्तरावर त्याबाबत चांगला निर्णय होईल अशी अपेक्षाही शिवतारे यांनी व्यक्त केली.--------------------  जबाबदारी महापालिकेचीच  महापालिका केशवनगर, लोहगाव, सूखसागरनगर व अन्य २ गावांमध्ये प्रत्येकी १०० टन असे एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करणार आहे. त्या गावांमधून याला विरोध झाला तर असे विचारले असता शिवतारे यांनी महापालिकेने ते पाहून घ्यावे असे सांगितले. फुरसुंगीने २१ वर्षे हा त्रास सहन केला आहे, त्या बदल्यात महापालिकेने तिथे काही विशेष खर्च केलेला नाही. आता या गावांमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे, त्याचा समावेश महापालिकेत झाला आहे, त्यामुळे तिथे विकासाचा समतोल साधला जाईल अशी अपेक्षा शिवतारे यांनी व्यक्त केली. ....................कचरा डेपो बंद होणार या शिवतारे यांच्या वक्तव्याला खो देणारी माहिती आयुक्त सौरव राव यांनी नंतर दिली. त्यांनी सांगितले की बैठकीत कचरा कमी करण्याबाबत टाईमलाईन प्रोग्रॅम ठरवण्यात आला. डेपो तिथे राहणारच, ड्राय कचरा आणून त्यावर तिथे प्रक्रिया केली जाईल. कचरा आणून डंप केला जाणार नाही. ती सर्व जागा महापालिकेच्याच मालकीची असून प्रसंगी त्यावरील आरक्षण बदलून तिथे उद्यानासारखे प्रकल्प करू, पण एक इंचही जागा कोणाला दिली जाणार नाही असे राव म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेfursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोuruli kanchanउरुळी कांचनSaurabh Raoसौरभ रावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका