शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 14:30 IST

इंदापूर बाजार समितीच्या उपबाजार भिगवण समितीचे पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत व्यापारी गाळे आणि आडतदार यांना माल साठविण्यासाठी गोडावून उभारलेले आहेत.

ठळक मुद्देबाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष : अपघात होण्याची शक्यता, दुरुस्तीची मागणी

भिगवण  : येथील उपबाजार समितीमधील गोडाऊन धोकादायक झाले आहे. हे गोडाऊन केव्हाही ढासळण्याची शक्यता आहे. बाजार समिती प्रशासन आणि गोडाऊन मालक अडतदार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. १२ महिने पाठपुरावा करूनही बाजार समितीकडून अडतदाराला नोटीस देण्याखेरीज कोणतीही कारवाई झाली नाही..इंदापूर बाजार समितीच्या उपबाजार भिगवण समितीचे पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत व्यापारी गाळे आणि आडतदार यांना माल साठविण्यासाठी गोडावून उभारलेले आहेत.मात्र अनेक वर्षांचा काळ उलटून गेल्याने या गोडावूनच्या इमारतींना तडे गेल्याचे पाहावयास मिळते.अशाच प्रकारे २० फुट उंची असलेले गोडावूनला गेल्या पावसाळ्यात तडे गेल्याचे दिसून आल्याने याची माहिती मार्केट कमिटी प्रशासनाला देण्यात आली होती.मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा काही भाग रात्रीच्या वेळेस ढासळला होता.यावर लोकमतने बातमी प्रसारित करून पावसाळ्याच्या दिवसात धोकेदायक इमारत ढासळून गंभीर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली होती.यावर मार्केट कमिटी प्रशासनाने तातडीने कारवाई करीत आडतदाराला नोटीस देत ७ दिवसाच्या आत धोकेदायक इमारतीचा भाग काढून घेण्यास सांगितले होते.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती यशवंत माने यांनी आडतदार यांनी सात दिवसात कार्यवाही न केल्यास मार्केट प्रशासन ही इमारत पाडणार असल्याचे ' लोकमत ' च्या प्रतिनिधीना सांगितले होते.मात्र, या बाबींना १२ महिन्याचा काळ लोटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच आजच्या घडीला वादळ आणि पावसाळ्याचे दिवस सुरु असून बाजाराच्या दिवशी पावसापासून वाचण्यासाठी शेतकरी याच इमारतीच्या आडोशाला उभे राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे घटना घडल्यावरच मार्केट प्रशासन जागे होणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबत इंदापूर बाजार समितीचे स्थानिक सदस्य आबासाहेब देवकाते तसेच अनिल बागल यांच्याशी संपर्क साधला असता अशी धोकेदायक इमारत हटविणे गरजेचे असल्याचे सांगत याविषयी बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे यांना याविषयी सूचना करणार असल्याचे सांगितले.याबाबत बोलताना बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे यांनी धोकादायक इमारती विषयी सबंधित आडतदार यांचा मार्केट कमिटीशी असणारा करार संपून गेला असल्याने धोकादायक इमारत तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून याबाबतची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले .तसेच आडतदार यांनी इमारत हटविने कामात हलगर्जीपणा केल्यास मार्केट कमिटीच्या कर्मचारी आणि साधनातून इमारत हटविली जाणार असल्याचे सांगितले...........४स्थापनेपासून काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली असणाºया बाजार समितीची  सत्ता हिसकावून राष्ट्रवादी सत्तेत आल्याने भिगवण बाजार समितीत फार सुधारणा होतील, अशी व्यापारी वर्गाची आणि भिगवण ग्रामस्थांची आशा होती. मात्र, तीन वर्षांत गाळेधारकांना भाडेवाढ आणि डिपोझीटवाढ याशिवाय कोणतीही सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. तर, मार्केट कमिटीतील गाळ्यांची दुरावस्था, पावसाळ्यात दुकानासमोर साठणारी डबकी आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील तुंबलेल्या गटारामुळे पसरणारी दुर्गंधी यांचा रोजचा अनुभव घेत व्यवसाय करावा लागत असल्याचे सत्य समोर येत आहे...............

टॅग्स :BhigwanभिगवणagricultureशेतीIndapurइंदापूर