शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'आई-वडिलांच्या सांभाळातच खरा देव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:08 IST

आई-वडिलांच्या सांभाळातच खरे देव असून माणसाला आशीर्वाद मिळत असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्तीमहाराज देशमुख यांनी व्यक्त केले. ​​​​​​

कोरेगाव भीमा : माणूस सुखी आयुष्य जगण्यासाठी व सुखी राहण्यासाठी देवाचे दर्शन घेण्यासाठी धडपडत असतो, परंतु खरा देव म्हणजे आई वडील असतात व आई-वडिलांच्या सांभाळातच खरे देव असून माणसाला आशीर्वाद मिळत असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्तीमहाराज देशमुख यांनी व्यक्त केले.शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिक्रापूरचे उपसरपंच व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे-पाटील यांचे वडील व जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांचे सासरे शामराव दिनकर मांढरे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुजाता पवार, राजेंद्र जगदाळे, स्वाती पाचुंदकर, रोहिणी सासवडे, काकासाहेब पलांडे, शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, रवींद्र काळे, वैभव यादव, कैलास नरके, नवनाथ कांबळे, सुभाष उमाप, मोनिका हरगुडे, विकास शिवले, बाबासाहेब सासवडे, शंकर जांभळकर, जयश्री भुजबळ, आबासाहेब करंजे, संजय जगताप, नीलेश थोरात, संतोष भुजबळ, जयश्री दोरगे, गौरव करंजे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘‘जीवन जगत असताना आई-वडिलांचा आशीर्वाद गरजेचा असून मुलांनी नेहमी आई वडिलांची मान अभिमानाने उंचावेल, या पद्धतीत वागून आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले पाहिजे,’’ असे सांगत मोबाईलच्या अतिवापराचे होत असलेले परिणामदेखील ह.भ.प. निवृत्तीमहाराज देशमुख यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांनी मांढरे कुटुंबीयांचे असलेले समाजोपयोगी कार्यदेखील कौतुकास्पद असल्याचे मत बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी व्यक्त केले. पार्थ नाणेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र मांढरे यांनी आभार मानले.