शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देव आले देवाला भेटायला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 12:02 IST

आपल्या घरातील मारुतीचे टाक घेऊन वीर मारुती मंदिरातील हनुमानरायाची भेट घडवून आणण्यासाठी गुरुवारी एकच गर्दी झाली होती़. 

ठळक मुद्देवीर मारुती मंदिरात दर्शनासाठी गर्दी

पुणे : उत्तर भारतातील विजयानंतर पेशव्यांना भेटीसाठी येण्यापूर्वी विजयी सरदार, वीर शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिरात एकत्र येऊन मारुतीचे दर्शन घेत व तेथे जमून ते पेशव्यांच्या भेटीला जात़ तो दिवस होता. धुलीवंदनाचा़ सुमारे सव्वा दोनशे वर्षांपूवीर्ची परंपरा पुण्यातील अनेक घराण्यांनी आजही जपली आहे़. आपल्या घरातील मारुतीचे टाक घेऊन वीर मारुती मंदिरातील हनुमानरायाची भेट घडवून आणण्यासाठी गुरुवारी एकच गर्दी झाली होती़. शहराच्या विस्तारामुळे आता ही कुटुंबे आता उपनगरात तसेच परगावी स्थायिक झाली आहेत़. तरीही धुळवडीच्या दिवशी ते आवर्जुन शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिरात दर्शनासाठी येताना दिसतात़. याबाबत कालीदास नाईक यांनी सांगितले की, पेशव्याच्या वेळी विजयी वीर एकत्र जमण्याची शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर ही जागा होती़. ते आपल्या शस्त्रांसह मारुतीचे दर्शन घेत असत़. त्यानंतर येथून ते पेशव्यांना भेटायला जात़ पुढच्या पिढ्यांनी ही परंपरा सुरु ठेवली़.  त्यांनी आपल्या मारुतीचे टाक करुन ठेवले आहेत़. धुळवडीच्या दिवशी घरातील टाक वाजत गाजत घेऊन येऊन वीर मारुतीची भेट घडवत असत़. काळाबरोबरच ही लोक काम, व्यवसायानिमित्त लोक शहराच्या उपनगरात काही दुसऱ्या गावात स्थायिक झाले़ असे असले तरी आम्ही ही परंपरा जपली आहे़. आम्ही सध्या सिंहगड रोडवर राहतो़ तेथून देवघरातून मारुतीचे टाक नारळाच्या वाटीत घेऊन ते एका शुभ्र कपड्यांमध्ये घेतले जातात़. आमची मुले हे पारंपारिक वेशात एका हातात तलवार व दुसऱ्या हातात टाक घेऊन येतात़.  ते मारुतीसमोर ठेवून देवाची भेट घडवितात़. या दिवशी वीर मारुती मंदिरात सुमारे ५०० जण दर्शनासाठी येत असतात़. मला जसे कळायला लागले तेव्हापासून आमची चौथी पिढी ही परंपरा पुढे नेत आहे़. 

टॅग्स :Puneपुणे