शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेळीचे लग्न बोकडाशी, अनोख्या पद्धतीने केला शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:05 IST

कडेपठार (ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी चक्क बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला

सुपे : जनाई शिरसाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी बारामतीच्या दुष्काळी भागाला मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी चक्क बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जमा झालेला ६८७ रूपयांचा आहेर सरकारला पाठवण्यात येणार आहे.जनाई शिरसाईच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्री उपोषण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू ठेवले आहे. या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने चौथ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी चक्क शेळी आणि बोकड यांचा शुभविवाह लावून आगळेवेगळे आंदोलन केले. ग्रामीण भागात जसा एकदा लग्नसोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने हा शेळी - बोकडाचा विवाहसोहळा पार पडला. या वेळी जमलेल्या लोकांना या लग्नासाठी अक्षदा वाटप करण्यात आल्या होत्या. बोकड आणि शेळीला बाशिंग आणि मंडवळ्या बांधून दोघांमध्ये (धोती) आंतरपाठ धरुन खास शैलीत पाच मंगलाष्टका म्हटल्या गेल्या. त्यानंतर उपस्थितांनी सुमारे ६८७ रुपये आहेर या विवाहसोहळ्यासाठी केला. या लग्नात ग्रामस्थांनी केलेला पैसेरुपी आहेर (६८७ रुपये) पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठवण्यात येणार आहे. जोपर्यंत योजनेचे पाणी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपोषणकर्ते सतीश जराड व गजानन सरक यांनी दिली. बारामतीच्या जिरायती पट्ट्यात पाणी सोडण्यासंदर्भात सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. तसेच, येथे सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणकर्त्यांनी चौथ्या दिवशी मुक्या प्राण्यांचे लग्न लावून सरकारचा निषेध केला.रविवारी (दि. ३) या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. या वेळी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतली. या वेळी सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, दूध संघाचे संचालक अप्प्पासो शेळके, संजय गाडेकर, वैशाली साळुंके, सरपंच विशाल कोकरे, कल्पना साळुंके, उपसरपंच पोपट गवळी, माजी सरपंच विठ्ठल जराड, बापूराव गवळी आदींसह महिला ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई