येथील बनकर मळा येथे मंगेश बनकर यांचे घर असून घराच्या जवळच गुरांचा गोठा आहे. त्या गोठ्यात शेळ्यांबरोबर इतर जनावरेही बांधली होती. या गोठ्याला सर्वत्र जाळी असून प्रवेश करण्यासाठी जागेवर त्यांनी गोठ्याला ट्रॅक्टरची ट्राॅली आडवी लावली होती. गोठ्याच्या शेजारीच गवताचे शेत आहे. बिबट्याने पहाटेच्या सुमारास गोठ्यात ट्राॅली खालून प्रवेश करून एक शेळी ठार केली. शेळ्या ओरडण्याचा आवाज आला असताना लगेचच घरातून मंगेश बनकर हे उठले त्यांनी मोठा आवाज केला असता त्यांनी बिबट्याला शेजारच्या गवताच्या शेतात जाताना पाहिले. या ठिकाणी वनरक्षक भंडलकर यांनी येऊन पंचनामा केला आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी सुरेश कामटकर यांनी केली आहे.
बिबट्याने ठार केली शेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:11 IST