शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ‘गो बॅक’

By admin | Updated: July 6, 2017 02:59 IST

नावळी (ता. पुरंदर) येथे आज जेजुरी एमआयडीसी टप्पा क्रमांक ५च्या संयुक्त मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कनीरा : नावळी (ता. पुरंदर) येथे आज जेजुरी एमआयडीसी टप्पा क्रमांक ५च्या संयुक्त मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही; त्यामुळे मोजणी न करताच अधिकाऱ्यांना परतावे लागले.जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी तालुक्यातील मावडी, नावळी व कोळविहीरे गावातील २,६०० हेक्टर जागा काही वर्षांपूर्वी आरक्षित करण्यात आली आहे. पैकी नावळी येथील जवळपास ११०० हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी प्रक्रिया आज राबविण्यात येणार होती. याकरिता भूमी अभिलेख खात्याकडून गटातील शेतकऱ्यांना सामायिक नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. यावर गावकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी पुणे क्र.२२ यांच्याकडे हरकती व कागदपत्रे सादर केली होती मात्र या हरकतींवर निर्णय होण्याअगोदरच मोजणी अधिकाऱ्यांनी नोटीसा देऊन मोजणीसाठी गावात आल्याने गावकरी आक्रमक झाले. आज सकाळी ग्रामस्थ गावातील मंदिरात एकत्र जमले होते. या वेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरले होते; मात्र अधिकारी थेट मोजणीच्या ठिकाणी पोहोचल्याने गावात एकच गडबड उडाली. गावकऱ्यांनी पळत जाऊन अधिकाऱ्यांना मोजणीपासून रोखले व आपली कैफियत तेथेच निवेदन देऊन मांडली.गावातील जमिनीची मोजणी करून बागायत, जिरायत तसेच पडीक जमीन, कुरण यांची मोजणी करून गटातील विहिरी, तळी यांची माहिती शासनास अभिप्रायासह पाठविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र या मोजणीमुळे शेकडो एकर जमिनी जाणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे मोजणीला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला. जमीन अधिग्रहणाच्या या प्रक्रियेमुळे गावातील सुमारे २०० शेतकरी बाधित होणार असून गट क्र. ११२ ते ४७९ या क्रमांकाचे ३६७ गटांची मोजणी करण्यात येणार होती. गावात धनगर समाजाच्या सुमारे २२००० शेळ्या मेंढ्या असून सुमारे ५५० हेक्टर क्षेत्र सामायिक आहे. ही जमीनही संपादित करण्यात येणार असल्याने पशुपालक तसेच शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तीनही गावांची जमीन जेजुरी एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी यापूर्वी आरक्षित केली गेली मात्र यावेळी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आरक्षण टाकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.मोजणीचा अट्टहास कशासाठी?जेजुरी एमआयडीसीच्या विस्ताराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. भूसंपादन करण्यास विरोध असल्याने गावकऱ्यांनी विविध लोकप्रतिनिधींकडे आपली कैफियत वेळोवेळी मांडली; मात्र आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनीपैकी काही जमीन आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातलगांची तसेच सख्य असणाऱ्या लोकांची आहे. त्यामुळे अशी जमीन शासनाने संपादन केल्यास वाढीव दराने मोबदला मिळणार असल्याने मोजणी प्रक्रिया तातडीने राबविली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यापूर्वी आरक्षित केलेली जागा तशीच पडून असून नवीन जागा संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा अट्टहास सुरु असल्याचा असे मत काहींनी व्यक्त केले.‘पुरंदर उपसा योजनेमुळे आत्ता कुठे पाणी उपलब्ध झाले आहे. लाखो रुपये खर्च करून जमिनी तयार केल्या आहेत तर काही अजून करत आहेत. शासनाने आरक्षण चुकीच्या पद्धतीने टाकले असून गावातील एक गुंठाही जमिनीचे अधिग्रहण होऊ देणार नाही. जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.’- मनोहर म्हस्के,माजी सैनिक, नावळी दराबाबतची बैठक उधळून लावणारआंबेठाण : सध्या आषाढी वारीसाठी बहुतांश शेतकरी गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत दर ठरवणे योग्य नसल्याची भूमिका घेत चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी संपादित होत असलेल्या जमिनीचा दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. उद्या होणारी दराबाबतची बैठक उधळून लावणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाच मध्ये आंबेठाण, बोरदरा, गोनवडी, रोहकल,चाकण , वाकी खुर्द या गावांमधील ७५३ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. या जमीनीसाठी मुल्यांकन दर निश्चीत करण्यासंबंधी उपजिल्हाधिकारी ( क्र. २६ पुणे ) यांनी वरील गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. शेतकऱ्यांना या चर्चेेसाठी येताच येऊ नये हा यामागचा हेतू असून या नोटीशीमध्ये फक्त एक दिवसाचा अवधी दिलेला आहे. शासनाचा हा कुटील डाव स्वाभिमानी शेतकरी संघटना हाणून पाडीलण असे पत्रक संघटनेचे संतोष परदेशी यांनी काढले आहे. शासनाने जर भूसंपादनासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचा तीव्र विरोध करून रस्त्यावर उतरेल अशा इशारा चाकण येथील झालेल्या बैठकीत देण्यात आला. या बैठकीसाठी तालुका अध्यक्ष जयप्रकाश परदेशी, बाबासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक राम गोरे, जालींदर पडवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.