शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जाणकारांनी गदिमांना कवीची नव्हे तर गीतकाराचीच पदवी केली बहाल : सई परांजपे यांची खंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:51 IST

गदिमांच्या साहित्याची दखल तथाकथित जाणकारांनी कवी म्हणून घेतली नाही.

ठळक मुद्देगदिमा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात डॉ. विनया बापट लिखित 'शॉर्ट स्टोरी आॅफ लेट जी. डी. माडगूळकर' पुस्तक प्रकाशन

पुणे:  गदिमांनी प्रेमगीते, अभंग, ओव्या, अंगाई, राष्ट्रभक्तीचे पोवाडे अशा सर्व प्रकारच्या रचनांना शब्दबध्द केले. मात्र, यासगळ्या त्यांच्या साहित्याची दखल तथाकथित जाणकारांनी कवी म्हणून घेतली नाही. तसेच त्यांना कवी न म्हणता गीतकार हाच किताब बहाल केल्याची खंत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केली. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सई परांजपे  यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना चैत्रबन पुरस्कार, अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांना विद्या प्राज्ञ पुरस्कार आणि ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर  यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्कारांबरोबरच  डॉ. विनया बापट लिखित 'शॉर्ट स्टोरी आॅफ लेट जी. डी. माडगूळकर' पुस्तकाचे प्रकाशनही डॉ. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर व्यासपीठावर होते.पुरस्काराला उत्तर देताना परांजपे म्हणाल्या, गदिमांची भाषा अस्सल आहे. त्यात कुठलीही भेसळ नाही. आकाशवाणीत निवेदक म्हणून काम करत असताना बा.भ. बोरकर, गोपीनाथ तळवळकर ,गदिमा अशा दिग्गजांना जवळून पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याचे अनेक प्रसंग आले. मात्र, गदिमा यांचे व्यक्तिमत्व खूप महान होते. याचा संकोच बाळगुन त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचे कधी धाडसच झाले नाही. आता या गोष्टीचा राग येत आहे.आता गदिमा स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने तो योग आला असून ती शाबासकी मिळत आहे.  ....................* गदिमांना भाषांची सुंदर वळणे उमगली....सहज संवाद बोलावेत अशी गदिमांची लेखनाची शैली कथा, गीतांमध्ये दिसून येते. औपचारिक शिक्षणाशी संबंध नसताना संस्कारक्षम शैलीमुळे ते चमत्कारिक वाटतात. गदिमांवर गीतरामायण, संतांचे, ओवीचे,भुपाळी, वाघ्यामुरळीचे, पोवाड्यांचे, जुन्या गाण्यांचे संस्कार होते. त्यामुळे भाषांचे अनेक सुंदर वळणे त्यांना उमगली. असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या. 

टॅग्स :Puneपुणे