शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्हाला तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 05:58 IST

सोशल माध्यमातून तीव्र निषेध : पुणेरी भाषेत सरकारचा पाहुणचार

पुणे : गोखलेकाका आपली गाडी ढकलत पेट्रोल पंपावर येतात. ‘काका कितीचे पेट्रोल भरू,’ पंपावरील कामगार त्यांना विचारतो. त्यावर काकांचा रागाचा पारा चढतो. ‘भरतोस कसलं, नुसतं १० रुपयांचं शिंपड. पेटवूनच टाकतो.’ दुसरीकडे पेट्रोलियममंत्र्याचे नाव ही खरी समस्या आहे. धर्मेंद्र यांना अजूनही वाटते, की बसंतीचा टांगा सव्वादोन रुपयांत ठाकूरच्या हवेलीवर सोडतो. या मेसेजमधून संंबंधित खात्याच्या मंत्र्यांवर घेतलेले तोंडसुख असो किंवा ‘गाडी आज उभी केली दारी, सायकल घेऊन निघालो कामावरी, पूर्ण होवोत तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पेट्रोल दरवाढीच्या हार्दिक शुभेच्छा...!’ यातून सरकारची यथेच्छ टवाळी केली जात आहे.पेट्रोलचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने या दरवाढीचा सोशल माध्यमांवर सरकारचा पुणेरी शैलीत निषेध व्यक्त केला जात आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच रोजच्या जगण्यात सर्वांत महत्त्वाच्या पेट्रोलच्या चढ्या भावाने सर्वसामान्यांचे धाबेच दणाणले आहे. याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सध्या सोशल माध्यमावर उलट-सुलट प्रतिक्रियांना ऊत आला आहे. त्यावर एकूणच महागाईविरोधात तोंडसुख घेतले जात आहे. पेट्रोलचा भाव चक्क ८४.५४ रुपये झाल्याने याविषयी अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोलच्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सरकारविरोधी असलेली खदखद सोशल माध्यमातून पुढे व्यक्त होत आहे. एक-दोन नव्हे, तर दहा दिवसांमध्ये सतत पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने नागरिकांचा रागाचा पारा वाढला आहे. एकीकडे वाढत्या गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीने चांगलाच घाम फोडल्याने त्याचा त्रास अन् त्रागा तिखट प्रतिक्रियेंच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. भाजपाने सत्तेवर येण्याआधी पेट्रोलचे भाव नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. तेच आता दरवाढ करत असल्याने सामान्य नागरिकांची लूटमार थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे पेट्रोल दरवाढ झाली दुसऱ्या बाजूला फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर त्यावर सडेतोडपणे भाष्य करणाºया कविता, विनोदी चुटकुले, वात्रटिका, चारोळ्यांचा पाऊस पडण्यास सुरु वात झाली आहे. याला सर्व स्तरांतून पसंती मिळत असून, काहीठिकाणी तक्रारींचा सूर अनेकांनी आळवला. त्यामुळे सोशल माध्यमांवरदेखील सरकारच्या बाजूने व सरकारच्याविरोधातील असे दोन गट पडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईने चिंतेत असताना त्यात पेट्रोलची होणारी दरवाढ त्याचे कंबरडेच मोडणारी आहे.यावर ‘रोज रोज वाढतोय दर, सर्वसामान्य भरतोय कर, देवा आता तूच काही कर, सरकारचे कुणालाच नाही का डर’ अशा प्रकारच्या चारोळ्यांमधून नागरिकांची वेदना मांडली जात आहे. याशिवाय विविध व्हिडीओ क्लीपमधूनदेखील राग व्यक्त केला जात आहे. एक व्यक्ती जी हेल्मेट घालून आपल्या गाडीवर निघाली आहे, मात्र ती गाडी स्वयंचलित नसून तिला एक गाढव ओढत आहे. अनेक संघटना, राजकीय पक्ष यांनी वाहनांच्या पेट्रोल टाक्यांना हार घालून निषेध केला आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलSocial Mediaसोशल मीडिया