शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दरीत कोसळलेल्या तरुणाला झाडांनी दिले जीवदान , वानरलिंगी सुळक्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 03:23 IST

आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला.

जुन्नर : आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. वन विभागाचे कर्मचारी तसेच जुन्नर येथील स्थानिक गिर्यारोहकांच्या ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या गिर्यारोहकाला सुरक्षित वाचविण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून शरण सावंत असे या जखमी गिर्यारोहकाचे नाव आहे.जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसराच्या आदिवासी भागातील घाटघरजवळील जिवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोह येत असतात. शनिवारी सकाळी वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी भोर येथून आलेल्या प्रणय सावंत (वय १७) आणि शरण सावंत (वय २२) या दोन गिर्यारोहकांपैकी एक गिर्यारोहक शरण सावंत हा शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सुळक्यावर चढाई करत असताना २०० फूट खोल दरीत कोसळला. नशीबाची साथ होती म्हणून २०० फूट खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला.वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर, पंधरा फूट उंचीवर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्याच्या हाताची पकड सैल झाली. यामुळे त्याचा हात निसटल्याने वानरलिंगी सुळक्याच्या पश्चिमेला बाजूला दोनशे फूट खोल दरीत कोसळला. त्या वेळी त्याचा भाऊ प्रणय सावंत याने मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळच्या हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याबाबत तातडीने जुन्नर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गिर्यारोहक असलेले वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना मदतीसाठी बोलवले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक रमेश खरमाळे, घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेन्डोसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहिदास आढारी, विनायक गोसावी, अक्षता मांढरे, तेजस पोटे, गौरव कांबळे या बचाव पथकाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर या गिर्यारोहकाला वाचविले. या गिर्यारोहकाला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या