शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

बंद जलवाहिनीद्वारे पाणी द्या, कृषितज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 2:07 AM

निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

इंदापूर - निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ हटवण्यासाठी सध्याच्या काळात कालबाह्य ठरत चाललेली शासनाची पाणीवाटपाची पद्धत बंद करून, पाण्याची किंमत ठरवून बंद जलवाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध केले जावे, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.पाणी मोजून बंद जलवाहिनीद्वारे शेतकºयांना उपलब्ध करून देण्याचा उपाय हितकारक ठरेल. त्यामुळे वीर भाटघर धरणामधील शिल्लक राहिलेले पाणी वेळोवेळी नीरा नदीवरील बंधाºयांमध्ये सोडता येईल. दरवर्षी पाऊसमान कमी होत चाललेले आहे, हा गैरसमज शेतकºयांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७५० मिमी आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात तीस ते चाळीस पावसाळी दिवसांत तेवढाच पाऊस पडत आहे. जून, जुलै व सप्टेंबर हा त्याचा कालावधी आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विद्युत मोटार टाकून पाणी उपसले जात आहे. बाभुळगाव ते नृसिंहपूर भागातील नदीला पाणी सुटले, की विद्युत मोटारीने पाणी उपसतात. जांब, कुरवलीपासून नृसिंहपूर भागातील शेतकरी बंधाºयातील पाणी वापरतात. तालुक्यातून वाहणाºया नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातूनही सायफन वा विद्युत मोटारीने पाणी उचलतात. नदी, नाले, ओढे कोरडे पडतात. दुष्काळसदृश स्थिती उद्भवते.तुटपुंज्या पाण्यावर करावी लागतेय शेती४शासनाचे पाणीवाटपाचे धोरण कालबाह्य ठरत चाललेले आहे. नीरा डाव्या व उजव्या कालव्याला सोडलेले सत्तर टक्के पाणी शेतकºयांच्या शेतीपर्यंत पोहोचेस्तोवर कालव्यामधून झिरपून ओढ्या, नाल्यांना मिळते. पाणी उचलून शेतकरी आपल्या शेततळ्यात सोडतात. तुटपुंज्या प्रमाणात राहिलेले पाणी अधिकृतपणे शेतीला वापरले जाते. त्याचा पिकाला पाहिजे तसा वापर होत नाही. कारण एकदा पाटपाण्याने पाणी दिल्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याची पाळी येते. तोवर पाण्याअभावी पीक जळालेले असते.या निसर्ग वा मानवनिर्मित दुष्काळापासून शेती वाचवायची असेल तर जलसंपदा खात्याने सखोल अभ्यास करून पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत वापरात आणावी.पाण्याची किंमत ठरवून पाणी मोजून ते शेततळी भरण्यासाठी अधिकृतपणे शेतकºयांना द्यावे. बंद जलवाहिनीतून पाणी दिल्यास नीरा डाव्या कालव्यावर असणारा बारामती, इंदापूरच्या आसपासचा भाग सिंचित होईल. वीर भाटघर धरणात पाणी शिल्लक राहील. असेच नीरा उजव्या कालव्याच्या क्षेत्रातही दिसून येईल, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे