शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:42 IST

किमान २५ रुपये दराने दूध खरेदी करावी अन्यथा भुकटीवर दिलेले जाणारे तीन टक्के अनुदान बंद करण्यात येईल अशी तंबी महादेव जानकर यांनी दूध कंपन्यांना दिली

ठळक मुद्देदेशात पाच लाख टनापेक्षा जादा दुध पावडरचा साठा अद्याप शिल्लकयेत्या काही दिवसांत शेतक-यांना फायदेशीर ठरेल असा योग्य भावाचा ७०/30 चा कायदा आणणार

पुणे: खासगी कं पन्यांकडून शेतक-यांची होत असलेली पिळवणूक थांबविण्याकरिता कडक पावले उचलणार असून सध्याच्या दुधभाव वाढीच्या ज्वलंत प्रश्नाकरिता शासन क टिबध्द राहणार आहे. राज्यशासनाने दुधाचा भाव २७ रुपये प्रति लीटर सक्तीचा आहे. या दरावर सविस्तर चर्चा करुन तो किमान २५ तरी शेतक-यांना द्यावा. असा सज्जड दम पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी खासगी कंपन्या व सहकारी दुध संघांना दिला आहे. याबरोबरच जे कोणी या दराने दुधखरेदी करणार नाहीत त्यांचे भुकटी अनुदान बंद करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.     जानकर म्हणाले, सध्या ६० टक्के दुध खासगी, एक टक्का सरकारी आणि ३९ टक्के दूध संकलन हो सहकारी क्षेत्रातून संकलित केले जात आहे़. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुध पावडरचे दर अत्यंत कमी झालेले असून देशात पाच लाख टनापेक्षा जादा दुध पावडरचा साठा अद्याप शिल्लक आहे़. राज्यात उत्पादित होणा-या दुधापैकी ४० टक्के दूधाचा वापर हा पिशवीबंद किंवा अन्य प्रकारे दुध विक्रीसाठी केला जातो़.  उर्वरित दुधापासून दुग्धजन्य पदार्थ उत्पादन होते. तर मोठया प्रमाणावर दूधाची पावडर निर्मिती केली जाते़. या निर्णयानुसार दुग्धव्यवसाय विभागाचे अधिकारी पाहणी करून कारवाई करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. शासनाने दूध भुकटी उत्पादन करणा-यांना प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान मार्च २०१८ मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा २० टक्यांनी जास्त  आहे. हा निर्णय विचार पूर्वकच असल्याचे दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी यावेळी सांगितल़े ...............दुध धोरण लवकरच होणार जाहीर दुधाला 70 टक्के भाव देण्याकरिता प्रयत्नशील राहणार असून उर्वरीत रक्कम ही दुधावरील प्रक्रियेकरिता वापरण्यात येईल. येत्या काही दिवसांत शेतक-यांना फायदेशीर ठरेल असा योग्य भावाचा ७०/30 चा कायदा आणणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच राज्याचे दूध धोरण लवकरच जाहीर करणार असून शेतक-यांसाठी मिल्क फंड उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :PuneपुणेMahadev Jankarमहादेव जानकरmilkदूध