शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज द्या - स्वाभिमानी शेतकरी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:20 IST

केंद्र सरकारने साखरेचा केवळ साठा (बफर स्टॉक) करून साखर उद्योगासमोरील प्रश्न सुटणार नाही. सरकारने साखर कारखान्यांना २९०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.

पुणे : केंद्र सरकारने साखरेचा केवळ साठा (बफर स्टॉक) करून साखर उद्योगासमोरील प्रश्न सुटणार नाही. सरकारने साखर कारखान्यांना २९०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच, शिल्लक असलेल्या साखरेचे मूल्यांकन २९०० रुपये मानून राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना कर्जाच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.केंद्र सरकारने साखरेची किंमत २९ रुपये प्रति किलो इतकी निश्चित केली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने कारखान्यांच्या उर्वरित शिल्लक साखरसाठ्याचे २९०० रुपये दराने मूल्यांकन करून कारखान्यांना फरकाची अतिरिक्त रक्कम दिली पाहिजे. त्यामुळे ऊस उत्पादकांची थकबाकी देता येईल. देशभरात साखरेचा दर समान नसतो. तसेच उत्तर प्रदेशने राजस्थान आणि पूर्व भारतातील बाजारपेठ काबीज केल्याने राज्यातील साखर शिल्लक राहण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना बिनव्याजी कर्जरूपी मदत केली पाहिजे, असेही तेम्हणाले.साखरेच्या निर्यातीवर हवा भरआॅक्टोबर २०१८ अखेरीस देशात तब्बल १२० लाख टन साखर अतिरिक्त राहणार आहे. सरकारने ३० लाख टनांचा बफर स्टॉक करण्याची घोषणा केली आहे. तर पुढील हंगामात ३४० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. म्हणजेच शिल्लक साखरेचे प्रमाण २४० लाख टनांवर जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीवर अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे. गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत न करता त्यांना साखर व दूध पावडर द्यावी, जेणेकरून देशातील अतिरिक्त उत्पादनाचा बोजा कमी होईल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने