शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

हक्काचा रोजगार द्या! आदिवासींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:49 IST

आंबेगाव तालुक्यातील गरीब, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेने तहसील कचेरीवर मोर्चा काढला. रोजगार हमी योजनेच्या कामांचे ‘शेल्फ’ काढले जावे, कामे उपलब्ध व्हावीत, ही मुख्य मागणी होती.

घोडेगाव - आंबेगाव तालुक्यातील गरीब, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेने तहसील कचेरीवर मोर्चा काढला. रोजगार हमी योजनेच्या कामांचे ‘शेल्फ’ काढले जावे, कामे उपलब्ध व्हावीत, ही मुख्य मागणी होती.हा मोर्चा अ‍ॅड. नाथा शिंगाडे, अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजेंद्र घोडे, कृष्णा वाडेकर, लक्ष्मण मावळे यांच्या नेतृत्वाखाली झाला. यामध्ये तालुक्याच्या आदिवासी विभागातील लोक बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी किसान सभेने मागणी केली, की रोजगार हमी कायद्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आपल्या व पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या कामांचे ‘शेल्फ’ तयार करून ठेवणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजेनुसार मागेल त्यावेळेस त्यांना काम उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यात वर्षानुवर्षे शेल्फ तयार केला जात नाही. त्यामुळे ग्रामसेवक मजुरांचे काम मागणीचे अर्ज स्वीकारत नाहीत. यामुळे गोरगरीब, कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळत नाही, यासाठी तत्काळ शेल्फ काढले जावेत.या सर्व मागण्यांसंदर्भात तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आंदोलनातील प्रमुख लोकांशी चर्चा करून प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढला. तसे लेखी पत्रदेखील किसान सभेला देण्यात आले, त्यानंतर हा मोर्चा संपला.गावच्या स्तरावर रोजगार हमीची विविध कामे सुरू करावीत, पंचायत समितीमधील रोजगार हमी विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी हे पद त्वरित भरले जावे, तालुक्यातील सामूहिक वनहक्क व वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करावेत, तालुक्याच्या आदिवासी भागात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू व्हावी, तळेघर येथे स्टेट बँकेची शाखा त्वरित सुरू व्हावी, निराधारांची पेन्शनवाढ व्हावी व नवीन पात्र गरजू व्यक्तींना निराधार पेन्शनची योजना मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी व नियमित डॉक्टर असावेत, १०८ नंबरची रुग्णवाहिका आदिवासी भागात उपलब्ध करावी, गरीब व्यक्तींन २१ हजार रुपयाचा दाखला मिळावा अशा मागण्या केल्या.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या