शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना द्या मोफत पाणी; शहरातील सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 07:04 IST

शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

पुणे : शहरातील विविध मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्धकरून देण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. या संदर्भात सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला महापालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात. सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी ३० ते ४५ रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे दर द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला होता. या प्रस्तावावर शुक्रवारी (दि. २७) झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.स्वच्छतागृहाची सेवाही देण्याचे आदेशशहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडेयांनी सांगितले, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नियमानुसारमोफत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.अनेक मॉलमध्ये ही सुविधा दिली जात नाही.यामुळेच शहर सुधारणा समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करून सर्व मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.याबाबत प्रत्येक मॉलने दर्शनी भागावर ‘येथे पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.’ असे स्पष्ट लिहिण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.याबाबत सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटिसा देण्यात येणार असून, अशी सुविधा न देणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणी