शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदचा खर्च द्या केरळच्या आधारासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 04:27 IST

पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन, २४ तासांत २५ हजार जमा; तरुणाचा पुढाकार

वारजे : देशभर बुधवारी साजऱ्या होणाºया बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी खरेदीकरिता होणाºया खर्चाला कात्री लावावी आणि हा निधी केरळमधील पूरग्रस्त बांधवांना हस्तांतरित करण्याचे आवाहन वारजे येथील एक मुस्लिम तरुण करीत आहे. विशेष म्हणजे, रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनीही अवघ्या २४ तासांत सुमारे २५ हजार रुपये जमादेखील केले. पैगंबर शेख असे या तरुणाचे नाव असून तो वारजे येथील रामनगर भागात राहतो.केरळवासीयांना मदत करण्यासाठी रविवारी त्याने आपल्या फेसबुक वॉलवरून लाईव्ह व्हिडीओद्वारे आवाहन केले. कुर्बानीसाठी काही नागरिक खर्च करीत असतात. यासाठी मोठा व विशेष बोकड खरेदी करण्याच्या पवित्रा अनेक जणांचा असतो. अल्लाह् हा फक्त आपली नियत व भावना पाहत असतो.आपण केवळ पाहत न राहता या कठीण काळात मदत केली पाहिजे. यासाठी फक्त मुस्लिमच नाही, तर सर्व धर्मीय बंधू-भगिनींना त्याने आवाहन केले आहे. त्याच्या आवाहनाला सर्व समाजातून प्रतिसाद मिळत आहे. निधी हस्तांतरित केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्याचे आवाहनदेखील त्याने केले आहे. ज्याने इतरांना अशी मदत करण्यास चालना मिळेल.पैगंबर शेख हा छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्याने गेल्याच आठवड्यात संविधान सन्मान सभेत सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनालादेखील खूप प्रतिसाद मिळाला होता. तो स्वत:देखील या सभेत सामील झाला होता. याशिवाय, गडसंवर्धन व गड भटकंती मोहिमेतदेखील तो सहकाºयांसह अग्रेसर आहे.बकरी ईदच्या तुमच्या कुर्बानीतील काहीच अंश अल्लाह्पर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची नेक भावना. या ईदला जर आपण केरळवासीयांच्या दु:खावर अशा प्रकारची मदत करून काहीअंशी फुंकर मारायचा प्रयत्न केला, तर अल्लाह्पर्यंत आपली अजूनच नेक भावना पोहोचेल, असे मला वाटते. माझ मित्र समीर नदाफ याने बोकडाच्या खरेदीतील हिस्सा कमी करून व मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चात कपात करून ३ हजार रुपये केरळ मुख्यमंत्री निधीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. निधी हस्तांतरित करण्यासाठी आॅनलाईन ट्रान्सफर सुविधा उपलब्ध असून त्यासाठी सरकारने स्टेट बँकेचे खाते उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय, पेटीएम या आॅनलाईन पेमेंट प्रणालीमध्येदेखील केरला / कोडगू फ्लड या नावाने पेमेंटची लिंक उपलब्ध आहे.- पैगंबर शेख

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणे