शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विधायक विचार पुढील पिढीला द्यावे : रवींद्र सेनगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 02:52 IST

शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे उदय जगताप यांचा सन्मान

पुणे : समाजाला दिशा देण्याचे काम करणारे कार्यकर्ते गणेशोत्सवातून घडतात. मात्र, आजचे उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे. बदलत्या स्वरूपाला आपण जबाबदार आहोत. केवळ उत्सवातील १० दिवसांपुरते नाही, तर वर्षभर आपण समाजासाठी खूप काही करू शकतो. केवळ स्पिकर्सच्या भिंती व थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार पुढच्या पिढीला द्यायला हवेत, असे मत दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी व्यक्त केले.

शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे भक्ती गणेशाची सेवा मानवाची असे कार्य केलेल्या, गडचिरोली नक्षलग्रस्त भागात केलेले सामाजिक कार्य व गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीबद्दल उदय जगताप यांचा जाहीर नागरी सत्कार केला. कुमठेकर रस्त्यावरील सेवासदन हायस्कूल मुलींची शाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद पंडित, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गोपाळ तिवारी, मंडळाचे शेखर साळुंके, प्रसाद पळसकर, गणेश घोले, संयोजक गणेश शेडगे, गोरख पळसकर, कृष्णा जाधव, संदीप पाषणकर, तुषार जोरी, योगेश फाळके आदी उपस्थित होते. कार्यकर्ता घडवणारे एकमेव विद्यापीठ गणेशोत्सवाच्या रुपाने उभारले आहे. यासाठी सामाजिक जाणीवही पात्रता असून सच्चा कार्यकर्ता ही मिळणारी पदवी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये समाजात सक्रिय व सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आहे. विकृतीवर प्रकृतीची आणि त्यावर संस्कृतीची मात करण्याचे काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे गणेशोत्सव नसता तर कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नसती. - डॉ. रामचंद्र देखणेप्रा.मिलिंद जोशी म्हणाले, ‘सनदशीर मार्गाने गोष्टी मिळाल्या, तर नक्षलवाद किंवा गुन्हेगारी निर्माण होणार नाही. ‘बुलेट नको, बुक हवे’ही संकल्पना अशा भागांमध्ये राबवायला हवी.’उदय जगताप म्हणाले, ‘हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, हे ब्रीद अंगिकारुन धनकवडीतील आदर्श मित्र मंडळामार्फत आम्ही काम केले. मंडळ आपल्या खिशातील पैशाने चालवू ही संकल्पना आणून कार्यकर्त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन देण्याकरीता पुढाकार घेतला. गडचिरोलीमध्ये देखील चांगले कार्य करणा-या पोलिसांना मदतीसाठी आम्ही गेलो. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, ती ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहेत.’ आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक