शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

दुचाकीस्वारांवर काळाचा घाला; तीन अपघातात चौैघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:58 IST

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर पुन्हा दुर्घटना : हेल्मेट नसल्याचा फटका

नीरा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. नीरा-वाल्हा दरम्यानच्या अरुंद रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. गुरुवारी अकराच्या सुमारास भरधाव पिकप टेंपोने दोन मोटारसायकललींना धडक देऊन पसार झाला. एक मोटारसायकल चालक जखमी असून एका चालकाचा उपचारादरम्यान व मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला आहे.

पालखी मार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यान जेऊर फाट्या शेजारी दोन मोटारसायकलींना भरधाव पिकप टेंपोची जोरदार धडक दिली. नीरा बाजुने जेजूरीकडे निघालेला भरधाव टेंपोने नीरेहुन जेऊरकडे निघालेल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२ जे.एच. ७१२० ला मागुन जोरदार धडक दिली. या मोटारसायकली वर मागे बसलेले रामदास चव्हाण (वय६५) जागीच ठार झाले. चालक विलास जाधव (वय ४५) गंभीर जखमी झाले होत. त्यांचा पुणे येथील रुग्णालयात संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघे पुरंदर तालुक्यातील जेऊर गावातील रहिवासी आहेत. नंतर जेजुरीहुन नीरा बाजुकडे निघालेल्य मोटारसायकलल क्रमांक एम.एच.१२ एल.डी. ७५६० ला समोरासमोर धडक दिली. या मोटारसायकलचे चालक मोहन वाघमारे (वय५०) रा. खेड (ता.खंडाळा) जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून खाजगी रुग्णालयात पुढिल उपचारासाठी पाठविण्यात आले.घटनास्थळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी तात्काळ भेट दिली.टेम्पोच्या धडकेने एक जण ठारनगर-कल्याण महामार्गावर राजुरी परिसरात दुचाकी व मालवाहू टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आळेफाटा पोलिसांचे वृत्त असे : दत्तात्रय मंजाभाऊ औटी (वय ५२, रा. राजुरी, ता. जुन्नर) राजुरी बाजूने आळेफाटाकडे दुचाकीवरून (एमएच १४ इआर १६५१) जात असताना नगर-कल्याण महामार्गावर राजुरी बसस्थानकासमोर कल्याण बाजूने नगरकडे जात असलेला मालवाहू टेम्पो (एमएच १४ एआर २६०२) विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीवर धडकला. या अपघातात दत्तात्रय औटी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. राजुरी येथील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेत ते सचिव म्हणून काम करत होते. अशोक बबन औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्योती डमाळे करत आहे.दुचाकीस्वार जागीच ठारमालवाहू टेम्पो व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात रविवारी रात्री सव्वानऊला घडली. आळेफाटा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार : नाशिक बाजूने पुण्याकडे जाणारा मालवाहू टेम्पो (एमएच १४ जीयू ६१८३) व आळेफाटा चौकातून पुढे जाणारी दुचाकी यांच्यात आळेफाटा चौकापासून महामार्गावर जवळच अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील तुषार सुरेश मावळे (वय २७, रा. आळेफाटा, मूळ रा. लोणी मावळ, ता. पारनेर) हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. संदीप हाडवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी अपघाताचा गुन्हादाखल केला आहे.पुणे-पंढरपुर पालखी मार्गावरील जेजुरी ओद्योगीक वसाहत ते नीरा शहरा पर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने सतत अपघात होतात. गेली वीस वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले नाही. मागील महिनाभरापासून विविध अपघातात तेरा जणांचा बळी तर पंचवीस ते तीस लोक जखमी असून खर्चीक उपचार घेत आहेत.४या सर्व अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. वारंवार पत्र व्यवहार करुन ही बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेतल्याचे जाणवते. अजून किती बळी गेल्यानंतर बांधकाम विभाग हा रस्ता रुंदीकरण करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Puneपुणे