लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, गतवर्षाच्या तुलनेत यात १.७१ टक्के घट झालेली आहे. त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीत देखील कोकण विभाग आणि मुलींनी बाजी मारली आहे.
मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का (स्ट्राइक रेट) मुलांच्या तुलनेत ३.८३ टक्क्याने अधिक आहे. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर निकाल जाहीर केला. याप्रसंगी सचिव देविदास कुलाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आकडे सांगतात
१५,५८,०२० नोंदणी केलेले विद्यार्थी१५,४६,५७९ परीक्षा दिलेले१४,५५,४३३ उत्तीर्ण झालेले
खचू नका, लढत राहा...
अपेक्षित यश मिळाले नसेल, तर आशा सोडू नका, धीर सोडू नका. खचून तर अजिबात जाऊ नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गुण कमी मिळाले म्हणून आयुष्य संपत नाही. गुण कमी घेऊनही भरारी घेणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यामुळे, खचू नका, लढत राहा....
दहावीत मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ३.८३ अधिक; राज्यात दहावीच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; कोकणची पुन्हा बाजी अन् नागपूर विभाग माघारला
सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई १०वी व १२वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात मुलींची कामगिरी सरस आहे. १२वीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे. दहावीत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले यातही मुर्तीचे प्रमाण मुलांपेक्षा २ टक्के अधिक आहे.
दहावीत २३,७१,९३२ पैकी ९३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी हे प्रमाण २३.६० टक्के होते. यात मुलींचे प्रमाण २५ टक्के, मुलांचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे.
बारावीत ८८.७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्यावर्षीच्या ८७.१८ टक्क्यांच्या प्रमाणात हे प्रमाण किंचित अधिक आहे. उत्तीर्ण मुर्तीचे प्रमाण २१.६४% तर मुलांचे प्रमाण ८५.७०% आहे.
दहावीत १.२९ लाख विद्यार्थ्यांना २० टक्क्यांवर गुण, ४५,५१६ जणांना २५ टक्क्यांवर गुण; बारावीत १.१६ लाख जणांना २० टक्क्यांहून अधिक गुण, २४ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांवर गुण.