शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

गुंडाच्या मारहाणीने मुलगी अत्यवस्थ

By admin | Updated: January 28, 2015 02:33 IST

एका १३ वर्षांच्या मुलीला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने ती जखमी झाली असून, वेदना असह्य होत असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवसापासून उपचार सुरू आहेत.

पिंपरी : एका १३ वर्षांच्या मुलीला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने ती जखमी झाली असून, वेदना असह्य होत असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवसापासून उपचार सुरू आहेत. या संदर्भात मुलीच्या आईने पोलीस आयुक्तालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, पोलिसांकडून काहीच हालचाल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत ही पिडीत मुलगी राहते. वडील ८ महिन्यांपूर्वी वारले आहेत. आई, बहिण, भाऊ आणि आजी असे पाच जण राहतात. आई धुणीभांडीचे काम करुन कुटुंबांचे पालनपोषण करते. गेल्या मंगळवारी (दि.२०) सायंकाळी झोपडपट्टीतील भास्कर अंबादास गायकवाड या गुंडाने मुलीच्या आईस शिवीगाळ करीत हाताबुक्काने मारहाण केली. या वेळी आईला सोडविण्यास ती गेली असता तिलाही गायकवाड याने हाताबुक्काने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात चिंचवड पोलीस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखपात्र नोंद केली आहे. सोमवारपासून (दि.२६) मुलीला अधिक त्रास होऊ लागला. पोट आणि छातीत असह्य वेदना होऊ लागल्या. यामुळे तिला उपचारासाठी काळेवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता. तिच्या छातीच्या बरगड्यात, पोटात आणि पाठीत दुखापत झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रविण ढोर्ले यांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तिला सलाईन लावले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे पिडीत मुलीच्या आईने सांगितले. गायकवाड यांची परिसरात दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे महिलेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. घटना घडून आठवडा उलट्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने मुलीच्या आजीने आश्चर्य व्यक्त केले. हा अन्याय आम्ही आणखी किती दिवस सहन करायचा असा सवाल त्यांनी केला. पिडीत मुलीचे सहावीपर्यत पालिका शाळेत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तिने शिक्षण अर्ध्यावर सोडून दिले. (प्रतिनिधी)