शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

गिरीश बापट यांनी घेतली अधिका-यांची झाडाझडती, टॅब देण्याचा निर्णय; कामे का नाही केली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:42 AM

अन्न व औषध निरीक्षकांना टॅब देण्याच्या निर्णयाला वर्ष झाले. त्यासाठी निधी दिला, त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नसेल तर तीही आम्हीच करायची का? कामं होत नसतील तर सांगा, पर्यायी व्यवस्था करु, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.

अतुल कुलकर्णी मुंबई : अन्न व औषध निरीक्षकांना टॅब देण्याच्या निर्णयाला वर्ष झाले. त्यासाठी निधी दिला, त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होत नसेल तर तीही आम्हीच करायची का? कामं होत नसतील तर सांगा, पर्यायी व्यवस्था करु, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.एफडीएमध्ये अनेक निर्णय घेतले पण पुढे त्याचे काय झाले हे पहायचे कोणी? असे सवाल करत बापट यांनी मंत्रालयात विभागाचा आढावा घेताना तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढूनही चार अधिका-यांना कार्यमुक्त केले नसल्याचे वृत्त लोकमतने २० सप्टेंबरला प्रकाशित केले होते. त्यावरुन बापट यांनी अधिका-यांना झापले. ही चूक कोणाही आहे असे विचारले असता, सगळे एकमेकांचे चेहरे पाहू लागले. डेस्क आॅफीसर वि.ग. शिंदे यांची चूक असल्याचे एका अधिका-याने सांगताच आदेश का पाळले नाहीत त्याची चौकशी करुन निलंबित करा, असे आदेश बापट यांनी दिले. मॅटच्या निर्णयाच्या विरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाण्याची कारवाई पूर्ण करा असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.सरकारने ५३१ टॅब खरेदी करण्यास मंजूरी दिली. हे टॅब अन्न व औषध निरीक्षकांना द्यायचे आहेत. टॅबसाठी निधी देऊन वर्ष झाले. यासाठीचे सॉफ्टवेअर कुठे आहे असे त्यांनी विचारले असता तयार आहे, दाखवतो अशी उत्तरे अधिकाºयांनी दिली. बैठकीस विभागाचे सचिव संजय देशमुख, आयुक्त पल्लवी दराडे तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.>चांगले निर्णय जर अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे अंमलात येत नसतील तर त्या अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक जरुर करु पण कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही.- गिरीश बापट, एफडीए मंत्री