शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जलसंधारणाच्या कामात जिल्हा अव्वल- गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:44 IST

जलसंधारणात जिल्हा परिषदेने चांगली कामे केली आहेत. ओढा खोलीकरण, गाळ काढणे तसेच जलयुक्त शिवारची कामे योग्य नियोजनामुळे झाल्याने यावर्षी पाणीटंचाई भासली नाही. जिल्हा टँकरमुक्तकरण्यासाठी भविष्यात भरघोस निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

पुणे : जलसंधारणात जिल्हा परिषदेने चांगली कामे केली आहेत. ओढा खोलीकरण, गाळ काढणे तसेच जलयुक्त शिवारची कामे योग्य नियोजनामुळे झाल्याने यावर्षी पाणीटंचाई भासली नाही. जिल्हा टँकरमुक्तकरण्यासाठी भविष्यात भरघोस निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. शासनाच्या निधीची वाट न पाहता कामांचे योग्य नियोजनकरून ठेवावे तसेच निधी मिळताच कामाला सुरुवात करावी. यामुळे कामांना गती मिळेल तसेच वेळही वाचेल. यामुळे ज्या त्या वर्षाचा निधी त्याच वर्षी खर्च होईल असा सल्लाही बापट यांनी दिला.जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामाचा आढावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी घेतला. या बैठकीप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, गटनेत्या आशा बुचके, गटनेते शरद बुट्टेपाटील, विठ्ठल आवाळे, रणजित शिवतारे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.मांढरे म्हणाले, जिल्ह्यात १०५ तलावांचे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, यामुळे जवळपास २ लाख टँकर पाणी साठेल असे ते म्हणाले.जिल्ह्यातील कचरा व्यवस्थापनाबद्दलच्या कामाबद्दल बापट यांनी प्रश्न उपस्थित केला. या वेळी तशी कुठलीही यंत्रणा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ८१ गावांचा डीपीआर तयार असून, १० ग्रामपंचायतींध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने स्वत:ची क्रीडा प्रबोधिनी उभारण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या क्रीडा संकुलाचा वापर करावा, अशा सूचनाही बापट यांनी दिल्या. सॅनेटरी नॅपकीनसाठी मिळालेल्या जवळपास ८० लाखांचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही, पशू विभागाकडील कोट्यवधींचा निधीही पडून असल्याने त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. ‘क’ वर्ग देवस्थानांचा विकास करताना कामांचे प्राधान्यक्रम ठरवून एकाच कामावर निधी खर्च केल्यास भाविकांनादर्जेदार सुविधा देता येतील, असे त्यांनी सांगितले.मुद्रांक शुल्क पीएमआरडीएकडे नकोमुद्रांक शुल्क हे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. ते पीएमआरडीएकडे वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली. या बरोबरच प्रत्येक गावात तसेच वाड्या-वस्त्यांवर स्मशानभूमीसाठी निधी मिळावा अशीही मागणी त्यांनी केली.कोरेगाव पार्क येथील जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात मिळावी, शिक्षक बदल्यांमध्ये शिक्षकांना न्याय मिळावा तसेच सर्व सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणारा निधी ४ वर्षांपासून रखडल्याने वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. हा निधी मिळावा अशी मागणी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापट