शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

महाकाय रेडिओ दुर्बिणीने टिपले सूर्यावरील सूक्ष्म चुंबकीय विस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 05:28 IST

जागतिक नोंद : पहिल्यांदाच भारतीय खगोल संशोधकांचे मिळाले यश, गोलाकार रिंगमधील उर्जेचे रहस्य उलगडले

अशोक खरात ।लोकमत न्यूज नेटवर्कखोडद (जि. पुणे): सूर्य हा सर्व जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक स्फोट होत असतात. त्यातून मोठी ऊर्जा प्रसारित होते. सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाºया सूक्ष्म रेडिओ चुंबकीय प्रकाशझोतांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाने मर्चिसन वाइल्डफिल्ड एक्सरे (एमडब्लूए) या दुर्बिणीतून घेतलेली माहिती आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओअ‍ॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या साहाय्याने हा शोध लावण्यात आला.

सूर्याच्या स्फोटांचा अभ्यास जगभरातले शास्त्रज्ञ करत आहेत. या स्फोटांवर जीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे. सूर्यावरील चुंबकीय विस्फोटाच्या धूम्र लाटांचा शोध ‘एनसीआरए’तील शास्त्रज्ञ प्रा. दिव्य ओबेरॉय त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणारे विद्यार्थी सुरजित मोंडल व पूर्व पीएच.डी. विद्यार्थी डॉ. अतुल मोहन या संशोधकांचा गट काही दिवसांपासून घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)चे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी ‘लोकमत’ला दिली.

सूर्यावरील तापमान अंदाजे साडेपाच हजार अंश सेल्सिअस इतके प्रचंड असते. या पृष्ठभागावर तब्बल २० लाख अंश सेल्सिअस तापमानाचा, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही साडेतीनशे पट जास्त तप्त असणाºया उष्ण वायूचा एक थर असतो. या थराची झलक संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान (खग्रास सूर्यग्रहण) पृथ्वीवरून पाहता येते.रहस्यमय प्रक्रियेचा झाला उलगडासूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राची ताकद एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी साधारणपणे हजारपेक्षा अधिक पटीने बदलत असते. सूर्यावरील करोना (गोलाकार रिंग) उष्ण आहे. ही उष्णता निर्मिती प्रक्रिया सूर्याच्या या गोलाकार पृष्ठभागावर समान पद्धतीने होते.अगदी सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील कमकुवत क्षेत्रांमध्येदेखील. आतापर्यंत ही चुंबकीय ऊर्जा करोनामध्ये कशी साठवली जाते, याची प्रक्रिया एक रहस्य राहिलेली होती. मात्र, त्याचा आता उलगडा झाला आहे.सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटांमुळे उत्सर्जित झालेले अ‍ॅ-रे आणि अतिनील किरणे शोधण्यासाठी यापूर्वी बरेच प्रयत्न केले गेले. पण एकदाही यश मिळाले नव्हते.- सुरजित मंडल, शास्त्रज्ञ, संशोधन कार्याचे प्रमुख लेखक