शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गणेश विसर्जन घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:54 IST

प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीत, विहिरीत, ओढ्यात विसर्जित होऊ नयेत यासाठी यंदाही महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पुणे : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीत, विहिरीत, ओढ्यात विसर्जित होऊ नयेत यासाठी यंदाही महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तब्बल ६० हजार नागरिकांनी आपली गणेश मूर्ती सार्वजनिक पाण्यात विसर्जित न करता, घरातील पाण्यात विसर्जित केली. यंदाच्या वर्षी त्यापेक्षा जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी आता गणेश मूर्ती विक्रेत्यांकडेच अमोनियम कार्बोनेट देण्यात येणार आहे.प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नाही. त्याचे लहानलहान तुकडे पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी जाऊन अडकतात. उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात अशा गणेश मूर्ती विसर्जित होत असतात असे आढळल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून घरगुती गणेश मूर्तींचे घरातच विसर्जन करा, अशी चळवळ राबविण्यात येत आहे.पुणे शहरात २ लाखांपेक्षाही अधिक संख्येने घरगुती गणेश मूर्ती बसवतात. या सर्व मूर्तींचे सार्वजनिक ठिकाणीच विसर्जन होत होते. त्यातूनच या चळवळीला सुरुवात झाली; मात्र पाण्यात मूर्तीचे विसर्जन लवकर होत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे त्या पाण्यात अमोनियम कार्बोनेटची पावडर मिक्स करण्यात येऊ लागली. तसे केल्याने मूर्तीचे लवकर विघटन होते. नंतर ते पाणी बागेतील झाडांना, वृक्षांना टाकले, तरी त्यापासून काहीही धोका होत नाही. पुण्यातील गणेश मूर्तींची संख्या लक्षात घेता काही टन अमोनियम कार्बोनेट लागणार होते. त्यामुळेच मागील वर्षी महापालिकेने यात पुढाकार घेतला.मागील वर्षी महापालिकेने सुमारे ७० टन अमोनियम कार्बोनेट खरेदी केले होते. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय पावडरचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यातआली. तब्बल ६० हजार नागरिकांचा याला प्रतिसाद मिळाला. काहीसंस्था, संघटना यांनी याप्रकाराला विरोध केला, मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असेच दिसले. त्यामुळेच यंदाच्या वर्षी महापालिकेने १०० टन अमोनियम कार्बोनेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे यावर्षीही घरोघरी वाटप करण्यात येणार आहे.महापौर मुक्ता टिळक यांनीही या चळवळीला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच विधिवत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.त्याचप्रमाणे पावडरचे वाटप घरोघरी करण्याऐेवजी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची विक्री करणाºया स्टॉलधारकांनाच ते देण्यात यावे. त्यांनी मूर्ती घेऊन जाणाºयांना ते द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. याही वर्षी क्षेत्रीय कार्यालये व प्रभाग कार्यालयांमधून ही पावडर नागरिकांना उपलब्ध व्हावी, यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.‘हिंदू जनजागृती समिती’चा विरोधगणेश मूर्ती विसर्जनसाठी अमोनियम कार्बोनेट वापरण्याचा निर्णय महापालिकेने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. हा निर्णय धर्मशास्त्राच्या विरोधात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. मागील वर्षी महापालिकेच्या या प्रयत्नांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित केली की, त्यातील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरते व वातावरणाची शुद्धी होते, असा युक्तिवाद समितीने केला आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असूनही असा निर्णय होणे दुर्दैवी असल्याचे समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी म्हटले असून, महापालिकेने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.महापालिकेने यावर्षी १०० टन अमोनियम कार्बोनेट घेतले आहे. स्थायी समितीने त्यासाठी खास परवानगी दिली आहे. नजीकच्या महापालिका कार्यालयांच्या माध्यमातून ते नागरिकांना उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मागील वर्षी या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षी ती संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे.- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागशाडूच्या मातीची गणेशमूर्ती पाण्यात लगेच विरघळते, त्यामुळे अशा मूर्तींसाठी ही पावडर वापरण्याचा प्रश्नच नाही, मात्र प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे पाण्याचे स्रोत बंद होतात. तसे होऊ नये यासाठी अशा मूर्तींचे विसर्जन घरगुतीच करावे. त्यातून पर्यावरण संवर्धनाचे काम होईल.- मुक्ता टिळक, महापौर