शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Swine Flu: 'ही' लक्षणे असतील तरच करा स्वाइन फ्लू ची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 13:45 IST

आरोग्य विभागाचे दवाखाने आणि खासगी प्रॅक्‍टीशनर्ससाठी आदेश

पुणे : स्वाइन फ्लू तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दवाखाने आणि खासगी प्रॅक्‍टीसनर्स साठी जुनेच आदेश नव्याने काढले आहेत. यामध्ये संशयित स्वाइन फ्लू च्या रुग्नांची लक्षणांनुसार ए, बी, सी या तीन प्रकारामध्ये वर्गवारी करा व त्यापैकी बी व सी गटातील रुग्णांचीच तपासणी करण्याची शिफारस करा असे म्हटले आहे.  सध्या स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढत आहे. याशिवाय सर्वसामान्य फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. परंतु सर्वसामान्यपणे कोणत्याही लक्षणे असल्यास त्यासाठी "एच1एन1' ची तपासणी करण्याचा सल्ला देऊ नये असे यामध्ये म्हटले आहे.

अशी आहे वर्गवारी

ए वर्गवारी

- थोडा ताप, कफ, घसा खवखणे, अंग दुखी, डोके दुखी, जुलाब उलटी होत असतील तर प्रयोगशाळा तपासणी करण्याची गरज नाही. यासाठी रुग्णाचे घरीच विलगीकरण करणे, योग्य ती औषधे घेणे आणि 24 तास देखरेखीखाली ठेवणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.

बी वर्गवारी 

- प्रमाणापेक्षा जास्त ताप, घशाला जास्त इन्फेक्‍शन आणि नाक गळत असेल तर त्यांची स्वॅब टेस्ट करणे आवश्‍यक आहे. त्यातूनही जर ही लक्षणे तीव्र असतील तरच या प्रयोगशाळा तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. यामध्ये रुग्णाला घरीच विलगीकरणात ठेवणे आणि त्या रोगप्रतिकारक औषधे देणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.

सी वर्गवारी

- तिसऱ्या सी वर्गवारी श्‍वास घेण्याला अडचण, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, नखे दुखणे यासारखी लक्षणे असतील तर त्यांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवणे आवश्‍यक आहे. तसेच गरज पडल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक आहे असे यात नमूद केले आहे.

हे आहेत अपवाद

गरोदर महिला, पाच वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्ध, कोमॉबिडीटी असलेल्या व्यक्ती, केमोथेरपी सुरू असलेल्या आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती यांच्यात लक्षणे आढळल्यास विशेष काळजी घेऊन त्यांची प्रयोगशाळा तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक