शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास करा सुरुवात - गेल आॅम्व्हेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:38 IST

साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे.

पुणे : साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे. नव्या युगाचे साहित्य लिहिण्यास आपण सुरुवात करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट यांनी व्यक्त केली.दलित युवक आंदोलन प्रणीत सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन २०१९ चे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका गेल आॅम्व्हेट आणि पत्रकार प्रतिमा जोशी मुंबई यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.संमेलनात स्वागताध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत घोडे, दलित युवक आंदोलन संस्थापक अध्यक्ष, सचिन बगाडे, अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे सोपान खुडे, सरू वाघमारे, भारत पाटणकर, प्रज्ञा कांबळे, प्रकाश सोनवणे, जोशीला लोमटे आदी उपस्थित होते. गुलामगिरीच्या बेड्या तोडून दुसऱ्या मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.आॅम्व्हेट म्हणाल्या, आजचे साहित्य दोन प्रकारचे आहे. एक प्रकार सरळ प्रस्थापित साहित्याचा आहे. दुसरा प्रकार जग बदलण्याची स्वप्ने पाहणारा, जनांच्या जीवनातील नवनिर्मितीचा, आणि सुंदरतेच्या बाबतीत साहित्य निर्माण करणारा आहे. साहित्य लिखाणात आनंदाचे प्रसंग, दु:ख संपवण्याची जिद्द, नवे जीवन मिळवण्याचा संघर्ष असायला पाहिजे.माणूस म्हणून जगणं विसरलोय...१ प्रतिमा जोशी म्हणाल्या, साहित्याचा दर्द आपण दु:ख या अर्थाने घेतो. साहित्यिक आपल्या भावनेतून कला व्यक्त करत असतो. सर्वश्रेष्ठ विनोदाला कारुण्याची उमेद असते. हे सर्व कलेचे पैलू आहेत. शिक्षणाने माणसे शहाणी होतात; परंतु आजच्या परिस्थितीत आपण माणूस म्हणून जगणे विसरलो आहे.२ काव्याला साहित्य, संस्कृतीत फारच महत्त्व असते. काव्य हे माणसाच्या हृदयातून यावे लागते. त्यासाठी आजूबाजूच्या माणूस आणि सृष्टीविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. साहित्य हे रोजच्या जगण्यापेक्षा वेगळे नसते. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवते.घोडे म्हणाले, महिलांना महात्मा फुले यांनी शिक्षण देऊन इतिहास घडवला. ज्या देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, तो देश इतिहासात प्रगतशील आहे. समाजात मुलींना शिक्षण, महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यास प्रवृत्त केले तर भारत देशाला महासत्ता होण्यास कोणीही रोखू शकणार नाही.खुडे म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला. पण या शिक्षणाचा सद्यस्थितीत फायदा होत आहे का, सर्वांनी याचा विचार करायला हवा. आईवडिलांचा आदर करा. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करा. साहित्य संमेलनातून हे विचार मांडणार आहोत. 

टॅग्स :Puneपुणे