शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

‘सोमेश्वर’च्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:26 IST

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली.

सोमेश्वरनगर - सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी संघटनेचे सतीश काकडे यांच्यातील वादविवाद वगळता सर्व विषयावर सविस्तर चर्चा पार पडली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी विविध विषयांवर खडाजंगी झाली.कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २८) कारखाना कार्यस्थळावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. जगताप यांनी गेल्या हंगामातील कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या हंगामात ९ लाख ८० हजार टनाचे गाळप करत सरासरी १२ चा उतारा ठेवत ११ लाख ७३ हजार साखर क्विंटलचे उत्पादन घेतले. चालू हंगामात ५० लाख टन साखरेला १३८ रुपये अनुदान देणार आहे. कारखान्यावर ४६ कोटींचे कर्ज असून त्याचे नियमित फेड सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.सभेत भाऊसाहेब भोसले आणि चंद्रशेखर काकडे यांनी शिक्षण संस्थेचा दर्जा ढासळला आहे. प्राचार्य सोमनाथ हजारे यांनी ज्या शिक्षकाचा विषय बंद झाला आहे, त्याला हजारो रुपयेपगार कशासाठी असा सवाल विचारला. सभेत अनेक सभासदांनी सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या चुकीच्या कारभारावर ताशेरे ओढवले. प्रमोद काकडेयांनी शिक्षण निधी कशासाठीकपात करायचा असा सवाल उपस्थित केला. यावर अध्यक्ष जगतापयांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी हा निधी कपात करणार असल्याचे सांगितले.ऊस बीलाचे दिलेले २०० रुपये अनुदानाप्रमाणे दिले आहेत. त्याचप्रमाणे सभासदांना अनुदान स्वरूपात साखर द्या. यासाठी न्यायालयात जावे लागणार नाही, अशी मागणी प्रमोद काकडेयांनी केली. यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी याबाबत ज्यांना २०० रुपयांबाबत न्यायालयात जायचे आहे, त्यांनी जावे असे सांगितले. गोरख खोमणे यांनी होळ, लाटे आणिकोºहाळे या गावात निरा नदीचे येणारे काळे पाणी बंद करण्याचीमागणी केली. कांचन निगडे यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधीची तरतूद व्हावी अशी मागणी केली.चंद्रशेखर काकडे, कांचन निगडे, जालिंदर जगताप, अ‍ॅड. बाळासाहेब गायकवाड, प्रा. बाळासाहेब जगताप, रामदास जगदाळे, भाऊसाहेब भोसले, विलास होळकर, दया चव्हाण, सतिश सावंत, अजय कदम, सुनिल भोसले, ज्योतीराम जाधव, सुनिल भोसले, रमाकांत गायकवाड, राजेंद्र जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला....फुकट साखर देऊसतीश काकडे व प्रमोद काकडे सभासदांना दहा किलो साखर मिळावी हा मुद्दा लावून धरला. यावर अध्यक्ष सतीश काकडे यांच्यावर चांगलेच भडकले. तुम्ही साखर आयुक्तांची परवानगी आणा फुकट साखर देऊ. तुम्हीच चुकीची कामे करायला लावायची व तुम्हीच तक्रारी करायच्या, हायकोर्टात जायचं असा टोला लगावला. या मुद्यावरून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या