शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सर्वसाधारण सभेनेही फेटाळली करवाढ; थकबाकी वसुलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:49 IST

स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनावर जोरदार टीका केली.

पुणे : स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनावर जोरदार टीका केली.नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी भारतीय जनता पार्टीला मते देऊन चूक केली असे पुणेकरांना वाटत असल्याचे सांगितले. सत्ता मिळाल्यापासून सातत्याने विविध गोष्टींवर थेट केंद्र, राज्य व आता महापालिकेकडूनही कर लादण्यात येत आहेत. काही लाख मिळकतींची नोंद नाही, त्यांना कर लावला जात नाही, वाढीव बांधकाम करणारे, बेकायदा उपहारगृहे, पब, बार चालवणारे यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रामाणिकपणे कर भरणाºयांचे खिसे मात्र जादा कर लावून हलके केले जात आहेत, हे चालणार नाही, असे सुतार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश कदम यांनीही प्रशासनालाधारेवर धरले. नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आपण नगरसेवक असतानाही आपल्या नावावर चुकीच्या पद्धतीने कर लावण्यात आला. तो दोन वेळा जमाकेला, त्यासंबधी प्रशासनाकडे चौकशी केली; पण उत्तर दिले नाही, असे सांगितले.महेश वाबळे, अजय खेडेकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, भय्या जाधव, महेंद्र्र पठारे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, जयंत भावे, माजी महापौर दत्ता धनकवडे यांचीही या वेळी भाषणे झाली. सर्वांनी करवाढीला एकमताने विरोध केला व प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रथम वसूल करावी, असे सांगितले.- स्थायी समितीने याआधीच ही करवाढ फेटाळली असल्यामुळे फारशी भाषणे झाली नाहीत, मात्र अंदाजपत्रकात तूट येण्यासाठी सर्वांनीच प्रशासनाला जबाबदार धरले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जीएसटीमुळेच तूट आली असल्याची टीका केली.

टॅग्स :Puneपुणे