शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या: समाजाचा प्रवास अविचारी झुंडीकडे, विविध मान्यवरांचा सूर : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:33 IST

गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे?

पुणे : गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत, वाद-प्रतिवाद होत आहेत. विचारांची हत्या करण्याचे हे सत्र घृणास्पद असून, सरकार मूग गिळून का गप्प बसले आहे? आपला प्रवास समाजाकडून झुंडीकडे होत आहे का? असे अनेक प्रश्न मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर उपस्थित केले.ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे आणि नीलिमा गुंडी या वेळी उपस्थित होत्या. संपादक विजय बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. मनोहर जाधव म्हमाले, लोकशाही व्यवस्थेने प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विचारांचा संघर्ष विचारांनी व्हायला हवा. मात्र, प्रागतिक विचारांचे, विवेकवादी लोक समाजाला शहाणे करण्यासाठी झटत असतात. मात्र, आता त्यांनाच प्राण गमवावे लागत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर येणाºया उन्मादी प्रतिक्रिया आपल्या संस्कृतीला शोभणाºया नाहीत. समाजाची वैचारिक वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, असा प्रश्न पडतो. बोलण्यावर, लिहिण्यावर निर्बंध आणून निर्माण केला जाणारा दहशतवाद मानवी मूल्यांसाठी घातक आहे.‘गौरी लंकेश यांचा खून झाल्यानंतर तासाभरात त्यांच्या आर्थिक हितसंबंधांसंदर्भात काही व्यक्तींनी व्यक्त व्हायला सुरुवात करणे आश्वर्यकारक होते. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होणेही धोक्याचे बनले आहे. ‘माणूस गेला तरी विचार संपत नाहीत’ असे म्हणणे म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे. या घटनांचा सर्वस्वी दोष राज्य व केंद्रातील गृहमंत्र्यांचा आहे. ते निष्क्रिय आहेत, तोवर कोणालाही शांतपणे जगता येणार नाही, असेही ते म्हणाले.डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘समाजात विशिष्ट प्रकारचा उन्माद पाहायला मिळत आहे. वैचारिक दृष्ट्या परिपक्व अशी महाराष्ट्राची विचारवंतांनी तयार केलेली प्रतिमा मलिन होत चालली आहे, हे आपले दुर्दैव. वैचारिक समाजाकडून आपला प्रवास मूल्यहीन, नीतिमत्ताशून्य समूहाकडे, झुंडीकडे होतो आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणPuneपुणे