शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गौरी काटे यांचा ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने सन्मान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:32 IST

ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी काटे यांना ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणा-या विविध क्षेत्रांतल्या महिलांना राज्य महिला आयोग व मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले होते.

काटेवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी काटे यांना ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणा-या विविध क्षेत्रांतल्या महिलांना राज्य महिला आयोग व मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले होते.महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वीरमाता आणि लेखिका अनुराधा गोरे आणि मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक रवींद्र आंबेकर यांच्या हस्ते सरपंच काटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, गयाताई कराड आणि सदस्य सचिव डॉ. मंजूषा मोळवणे या वेळी उपस्थित होत्या.या वेळी सरपंच काटे म्हणाल्या की, स्वच्छता अभियानच्या प्रणेत्या सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून गावचा ग्रामविकास साधला आहे. हा गौरव पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या सहभागाने प्राप्त झाला आहे. काटेवाडीला चकाचक करणाºया काटेंसह स्वत: दोन्ही पायांनी अपंग असूनही शेकडो महिलांना पायावर उभ्या करणाºया परभणीच्या आशालता गिरी, दारुबंदीसाठी प्रसंगी जीव धोक्यात घालणाºया बीडच्या सत्यभामा सौंदरमल, बाहेरच्या सौंदर्यापेक्षा स्त्रियांचे आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आलेल्या नंदिनी जाधव, नागपुरातील पहिली महिलांसाठीची बँक स्थापन करणाºया नीलिमा बावणे, बांधकाम व्यवसायाची धुरा पेलताना पोटतिडकीने सामाजिक बांधिलकी जपणाºया उज्ज्वला हावरे, स्वत: दृष्टिहीन असताना इतरांची आयुष्ये प्रकाशमान करणाºया धुळ्याच्या अरुणा बोळके, वैधव्यावर मात करत इतर विधवा-परित्यक्तांसाठी झटणाºया लातूरच्या भाग्यश्री रणदिवे आणि आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या ठाण्याच्या डॉ. मेधा मेहंदळे या महिलांना मॅक्स वूमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महिला आयोगासाठी हा महत्त्वाचा क्षण असून विविध क्षेत्रांत काम करणाºया महिलांचा गौरव तर होतच आहे. सोबत आयोग या महिलांच्या कामाशी यानिमित्तानं घट्टपणे जोडला जात आहे, असे विजया रहाटकर यांनी या वेळी सांगितले. बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, दारूबंदी, एकल महिलांना मदत, आयुर्वेदाचाप्रसार अशा प्रत्येक कामात आयोग भरीव योगदान देण्यास तयार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. या सर्व महिलांचे काम अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना अनुराधा गोरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे