शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांकडून पालिकेची ‘कचराकोंडी’; फुरसुंगी ग्रामस्थ मागण्यांवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 06:33 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मुदत देऊनदेखील फुरसंगी कचरा डेपो येथील ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे. हरित न्यायालयाने देखील महापालिकेला त्वरित ओपन डम्पिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मुदत देऊनदेखील फुरसंगी कचरा डेपो येथील ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे. हरित न्यायालयाने देखील महापालिकेला त्वरित ओपन डम्पिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फुरसुंगी ग्रामस्थांकडून याचाच आधार घेत ओपन डम्पिंगला विरोध करीत व आपल्या विविध मागण्या पुढे रेटण्यासाठी बुधवार (दि.१) पासून आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेची कचारकोंडी झाली असून, बुधवारी दिवसभरात एकही गाडी कचरा डेपोवर गेली नाही.दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून फुरसुंगी ग्रामस्थांची चर्चा सुरू असून, बुधावारी रस्ते दुरुस्ती, बाधित कुटुंबांतील व्यक्तींना महापालिकेत नोकरी देणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे आदी विविध पायाभूत सुविधा देण्याबरोबरच अनधिकृत बांधकामांबाबत देखील नरमाईची भूमिका घेतली आहे. यामुळे गावातील लोकांशी चर्चा करून, शुक्रवारी आंदोलन मागे घेतले जाईल, अशी आशा प्रशासनाला आहे. ग्रामस्थांनी आतापर्यंत कचरा डेपोविरोधात वेळोवेळी आंदोलने केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महापालिकेने ग्रामस्थांना कचरा डेपो बंद करण्याबरोबरच येथील विकासकामांची आश्वासने दिली होती. त्यात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निणर्यानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग बंद करणे आवश्यक आहे, हीच मागणी घेऊन फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डम्पिंगच्या विरोधात कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दिवसभरात कचºयाची एकहीगाडी कचरा डेपोवर ग्रामस्थांनी जाऊन दिली नाही.१६०० ते १७०० मेट्रिक टन शहरात रोज कचरा तयार होतो. त्यातील निम्म्याहून अधिक कचºयावर प्रक्रिया केली जाते; मात्र आजही फुरसुंगी येथील कचरा डेपोवर कचºयाचे ओपन डम्पिंग केले जात आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे.ग्रामस्थ आंदोलनावर ठाममहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यात महापालिका कचरा प्रश्नाबाबत कालबद्ध विकास कार्यक्रम आखेल, असे आश्वासन दिले आहे; मात्र ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असून, पुण्याचा कचराप्रश्न पुन्हा पेटणार आहे.

टॅग्स :Puneपुणे