शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

कचरा ट्रक पाहणारे कॅमेरेच चोरीला, दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:50 IST

किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला असून, आधी चोरीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

पुणे : किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला असून, आधी चोरीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.उरुळी देवाची फुरसुंगी कचरा डेपो तसेच बाणेर कचरा डेपो येथे बसवण्यासाठी म्हणून महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये काही सीसीटीव्ही खरेदी केले. बाणेर येथील डेपो बारगळल्याने ते कॅमेरेही फुरसुंगी येथे बसवण्यात आले. एकूण २२ कॅमेरे बसवण्यात आले होते. आता फक्त ८ कॅमेरे शिल्लक आहेत. त्यातलेही ३ बंद अवस्थेत आहेत.सजग नागरिक मंचाने कॅमेºयाने वर्षभरात कचरा चोरीला जात असल्याच्या किती घटना कॅमेºयात पकडण्यात आल्या याची माहिती मागितली. असे एकही प्रकरण घडलेले नाही. मुळातच शहरामधून जमा करून आणलेला हा कचरा चोरीला जाईल म्हणून तिथे काही लाख रुपये खर्च करून कॅमेरे बसवणे चुकीचे आहे.चोरी झालेल्या कॅमेºयांची चौकशी न करता प्रशासनाने लगेचच कमी असलेल्या कॅमेºयांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.त्यातही खुल्या बाजारातील याच कॅमेºयांची किंमत व महापालिकेने निविदेत नमूद केलेली किंंमत यात बरीच मोठी तफावत आहे, असे मंचाचे म्हणणे आहे.ही निविदा प्रक्रिया थांबवावी, चोरीच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPuneपुणे