शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घाट आहे की कचराकुंडी? बोपदेव घाटाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:43 IST

सासवड-हडपसर रस्त्यावरील दिवे घाट व सासवड-कोंढवा रस्त्यावरील बापदेव घाट रस्त्याच्या बाजूस राजरोस कचरा रसवंती गृहांची ऊसाची चिपाडे टाकण्यात येत आहेत.

सासवड : सासवड-हडपसर रस्त्यावरील दिवे घाट व सासवड-कोंढवा रस्त्यावरील बापदेव घाट रस्त्याच्या बाजूस राजरोस कचरा रसवंती गृहांची ऊसाची चिपाडे टाकण्यात येत आहेत. याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत असल्याने याठिकाणी कचरा टाकणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी केली आहे.दिवे तसेच बापदेव घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येतो आहे. यामध्ये रसवंती चालकांनी टाकलेली ऊसाची चिपाडे, हॉटेलमधील खरकटे, शहरातील ओला कचरा, मातीचा राडा रोडा, मृत कोंबड्या, जनावरे, कुजलेला नासलेला भाजीपाला, खराब फळे आदी कचरा या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच टाकला जातो काही वेळ तर तो रस्त्यावरही येत असल्याने वाहनांचे किरकोळ अपघातही झाले आहेत.या ठिकाणी हा कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. हे प्रकार जर आत्ताच रोखले नाहीत तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल. या ठिकाणी वणवा लागण्याची मोठी भीती आहे. या परिसरात वन्यजीवांचा मोठा वावर आहे.वणव्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणारआहे. पर्यावरण वाचविण्यासाठी संबधित विभागाने कारवाईकरावी, अशी मागणी करण्यातआली आहे.वन्यजीवांच्या जीवितासही धोकामुदतबाह्य औषधे बॅच नंबर, कंपनीचे नाव ओळखू येऊ नये म्हणून ती जाळण्यात येतात. त्याच्या धुराचा त्रास वाहनचालकांना होतो. तसेच त्या औषधांचे वेष्टन फुटल्याने ती पाण्यात अनेक वेळा मिसळल्यामुळे वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकणे व जाळणे गुन्हा आहे. रस्त्यावर कचरा टाकताना जर कोण आढळला तर त्याच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे.कारवाई किंवा दंड करण्याचा अधिकार तालुक्याचे तहसीलदार यांना आहेत. सध्या हडपसर-सासवड रस्ता देखभालीसाठी कोणाच्या अधिकारात आहे याची अधिकृत माहिती मिळत नाही.

टॅग्स :Puneपुणे