शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘गानसरस्वती महोत्सव’ २ फेब्रुवारीपासून रंगणार पुण्यात, यंदा प्रथमच गानसरस्वती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:13 IST

नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी येत्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात ‘गानसरस्वती महोत्सव’ रंगणार आहे.

ठळक मुद्दे२ ते ४ फेब्रुवारीदरम्यान रंगणार महोत्सव, सायंकाळी ५ वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवातरसिकांना अनुभवता येणार ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचाही आविष्कार

पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी येत्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात ‘गानसरस्वती महोत्सव’ रंगणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ आणि पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांचे गायन, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया व सारंगीवादक साबीर खाँ जुगलबंदी आणि पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन अशा सुरेल आविष्कारांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची घोषणा केली. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे.गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या नावाने सुरू असलेला हा महोत्सव पार पडत असून, या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देण्यात आहे.  प्रख्यात ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचाही आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहेत. शुक्रवारी (दि. २ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गायिका अपर्णा पणशीकर आपल्या सुश्राव्य गायनाने महोत्सवास प्रारंभ करतील. त्यांच्यानंतर बासरीवादक शशांक सुब्रह्मण्यम यांचे कर्नाटक शैलीतील बासरीवादन होणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ यांच्या स्वरमैफलीने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.महोत्सवाच्या दुसºया दिवशी शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) राजेंद्र  गंगाणी व सहकलाकार ऋजुता सोमण यांचे कथक नृत्य होणार आहे. त्यानंतर मंजिरी असनारे-केळकर यांचे गायन होईल. पं. मुकुल शिवपुत्र यांच्या स्वर्गीय स्वरांची जादू उत्तरार्धात अनुभवता येईल.रविवारी (दि. ४ फेब्रुवारी) महोत्सव दोन सत्रात रंगणार आहे. सकाळचे सत्र सकाळी ९ वाजता सुरू होणार असून, या सत्रात किशोरीतार्इंचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर आपल्या विशेष सादरीकरणातून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतींना स्वरांजली वाहणार आहेत.  महोत्सवाच्या अंतिम सत्रात प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया व सारंगीवादक साबीर खाँ यांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येईल. पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन आणि सुप्रसिद्ध गायिका पं. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन अशा कलाविष्कारांनी गानसरस्वती महोत्सवाची सांगता होणार आहे. हा महोत्सव राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. यंदा महोत्सवात प्रथमच २५० अशी मर्यादित रसिकांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या  महोत्सवात प्रथमच ‘गानसरस्वती’ पुरस्कार देण्यात येणार असून, पहिल्या पुरस्काराच्या मानकरी गायिका मंजिरी असनारे-केळकर ठरल्या आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून नाट्यसंपदा प्रतिष्ठान वतीने संगीतसेवेकरिता देण्यात येणारा गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार हा माऊली टाकळकर यांना व गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार हा बुधादित्य मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे ५१ हजार रुपये आणि १ लाख २० हजार रुपये असे आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महोत्सवात अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. किशोरीतार्इंना अभिवादन म्हणून त्यांच्या विविध साहित्याचे दालन महोत्सवात थाटण्यात येणार आहे. या दालनामध्ये १९७० पासूनची किशोरीतार्इंची छायाचित्रे, त्यांचे प्रकाशित साहित्य, तसेच विविध वस्तू मांडण्यात येणार आहेत. दुर्मिळ मैफलींचा आनंद येथे घेता येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे