शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कासुर्डीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; धक्क्याने वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:46 IST

उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

यवत : उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे आॅक्टोबरपासून हा प्रकार सुरू होता. तक्रार द्यायला आलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यातच बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. पीडित तरुणी, कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय आहेत.यवत पोलिसांनी नदीम या परप्रांतीय ठेकेदारासह मोहसीन व दिलवाज या दोन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पीडित तरुणी व तिचे कुटुंबीय खामगाव येथील गुºहाळावर मजूर होते. ठेकेदार नदीम याने पीडितेला १० आॅक्टोबर रोजी कासुर्डीच्या हद्दीत शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (पूर्ण नावे माहीत नाही. तिघे रा. उत्तराखंड) यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच काही दिवस डांबून ठेवले.आरोपींनी १७ आॅक्टोबर रोजी साडेसात हजार रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणाºया रेल्वेमध्ये या कुटुंबाला बसवून दिले आणि कोणाला काही सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी दिली. मात्र, पीडितेने कुटुंबीयांसोबत गंगाहर पोलीस ठाणे (ता. रुडकी, उत्तराखंड) येथे फिर्याद दिली. ती यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून मोहसीन व दिलवाज यांना अटक केलीे.दरम्यान, पीडिता व तिचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. तेथे वडिलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे