शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:20 IST

दृश्यम स्टाइल खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा खून केल्याचा गुन्हा उघड

लोणी काळभोर : पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा टाकून लूटमार करणारी आणि खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा दृश्यम स्टाइल खून करणारी कोयता गॅग जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने यश मिळवले आहे .

 याप्रकरणी किरण भाऊसाहेब थिटे ( वय २१, रा. केंदूर ता. शिरूर जि. पुणे ), गौरव बाळू ढवळे ( वय २१, रा. खोपवस्ती, अष्टापुर ता. हवेली ), संतोष गोरख ब्राम्हणे ( वय २०, रा. शनि शिंगणापूर, ता. नेवासा जि. अहमदनगर ) भाऊसाहेब गौतम कुडुक ( वय २२, रा. शेकटा, ता.गेवराई जि. बीड ) व दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट ( वय २१, रा उंब्रज, दांगट पट, ता. जुन्नर ) यांना अटक करण्यात आली आहे. 

 लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर धारदार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ५ अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी दरोडा टाकला होता. या दरोड्यात २ हजार ५०० रुपये रोख व ३७ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा  तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत होते. सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपींचा माग काढला ते रांजणगाव गणपती येथील असल्याचे समजले. त्यावरून रांजणगाव ५ संशयित पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.  

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, विजय कांचन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.  पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी लोणी काळभोर येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच २ जानेवारी रोजी रांजणगाव येथे योगेश मचिंद्र गर्जे ( वय २५, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे ) याची स्विफ्ट डिझायर गाडी बोलावून घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीत बसून वणी गड येथे फिरायला जाण्यासाठी सोनेसांगवी ते मलठण रस्त्याला गाडी नेली. लघवीचे नाटक करून गाडी थांबवून ती चोरण्याचा प्रयत्न केला. चालक योगेशने त्यास विरोध केला असता त्याच्या तोंडावर कोयत्याने तसेच दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर भवरापूर ( ता हवेली ) येथील मुळा - मुठा नदी वरील पुलावर आणून पुलावरून योगेशचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याचा हेतूने नदीच्या पाण्यात फेकून दिला असल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी त्यांना लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPetrol Pumpपेट्रोल पंपRobberyचोरीPoliceपोलिसArrestअटक