शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Mahotsav: मानाच्या गणपतींमुळे वेळेची अडवणूक नको, उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:14 IST

Ganesh Mahotsav: पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मुंबई :  पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील पाच मानाचे आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतरच अन्य सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी निघतात. विसर्जन मिरवणूक पुण्याच्या लक्ष्मी रोडवरून निघते. मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळी साडेसात वाजता होते.  शेवटच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री ११ वाजता होते. त्यामुळे  अन्य सार्वजनिक मंडळांचा खोळंबा होतो, असे पुणे बधाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बधाई यांनी याचिकेत म्हटले आहे. बधाई यांनी ही याचिका ॲड. अजिंक्य उडाणे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

याचिकेनुसार, बधाई यांनी पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवरून काढण्याची परवानगी मिळविण्याकरिता पोलिसांकडे अर्ज केला. मात्र, पोलिसांनी त्यास तोंडी नकार दिला.

...असा कायदा नाहीपाच मानाचे गणपती आणि सहावा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाल्याशिवाय अन्य सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड वापरू दिला जात नाही. आधी पाच मानाचे गणपती आणि दगडूशेठ हलवाईचा गणपती निघाल्यानंतरच अन्य सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करावे, असा कायदा कुठेही अस्तित्वात नाही. तरीही असा भेदभाव केला जातो, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. अन्य छोट्या मंडळांच्या गणपतींना मानाच्या गणपतींच्या आधी निघण्यापासून अडविण्यात येते, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPuneपुणेCourtन्यायालय