शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची ३०० वर्षांची परंपरा : भोर शहरातील फडणीस वाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 12:47 IST

फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा आहे.

ठळक मुद्देपारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव होतो आजही साजरा

पुणे : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेला भोर शहरातील शिवापुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही सुरू आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा वापर करून गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिक येत आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासून ३०० पूर्वी व्यंकोजी फडणीस व चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शु. प्रतिपदा ते भाद्रपद शु. पंचमीदरम्यान ५ दिवस अष्टविनायक गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा केला जात आहे. गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी फडणीस अरुणकाका जोशी यांच्या घरून गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीसवाड्यात आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीला दररोज एक हजार दुर्वा वाहिल्या जातात. दुपारी ११ ते १२.३० दरम्यान जन्मकाळाचे कीर्तन व नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर गणेश पुराणवाचन, नारायण काणेबुवा यांचे कीर्तन, प्रवचन झाले. रात्री धूपारती व हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला.   फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा आहे. त्यात यमाईदेवीची लाकडी मूर्ती असून गणपतीची एक मूर्ती पितळी व एक तांब्याची आहे. गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी लळिताचे कीर्तन असून त्याचा प्रसाद रात्री दिला जातो. अशा पद्धतीने गणेश जन्मोत्सव संपूर्ण राज्यात भोर येथील फडणीसवाड्यात फडणीस व शनिवारवाड्यात पेशवे आणि मुजुमदारवाड्यात मुजुमदार मागील ३०० वर्षांपासून अखंडपणे साजरे केले जात असल्याचे प्रमोद फडणीस यांनी सांगितले.......

भोरचे राजे पंतसचिव पूर्वी आंबवडे गावात व फडणीस चिखलावडे गावात राहत होते. पंतसचिवांबरोबर फडणीसही भोरला राहायला आले. मात्र चिखलावडे गावात आजही त्यांचे गणेश मंदिर आहे. 

भोर येथील फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सवाला वेल्हे कोषागारातून २७ रुपयांच अनुदान मिळत होते. रोषणाईचे साहित्य भोरचे राजे पतंसचिव देत असत. पंतसचिव सर्व लवाजम्यासह गणेशजन्मकाळाच्या कीर्तनाला स्वत: हजेरी लावत असत. 

मात्र, संस्थाने खालसा झाली आणि पुढे ही परंपरा बंद झाली असली तरी मागील ३०० वर्षे अखंडपणे फडणीसवाड्यात व्यंकटेश रामचंद्र फडणीस, त्यांचे पुतणे प्रमोद फडणीस ही दोन कुटुंबे सर्व खर्च करून आपली परंपरा आजही कायम जपत आहेत.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव