शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गंधर्व गायकीचे सूर आजही निनादतात...! : कीर्ती शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 20:18 IST

बालगंधर्वांचे जादुई सूर पंजाबी, तेलुगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये : कीर्ती शिलेदार

ठळक मुद्देकिर्ती शिलेदार : चंद्रशेखर देशपांडे यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदानबालगंधर्वांचे जादुई सूर पंजाबी, तेलुगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये

पुणे : नटसम्राट बालगंधर्व यांनी मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवले. भाषाभेद, प्रांतभेद दूर सारुन त्यांनी नाटक सर्वदूर पोहोचवले. बालगंधर्वांचे जादुई सूर पंजाबी, तेलुगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये पोहोचले. संगीत रंगभूमीवर आजही गंधर्व गायकीचे सूर निनादतात, अशा शब्दांत नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी बालगंधर्व यांच्या ललितमधुर गायकीच्या आठवणींना उजाळा दिला.महानगरपालिकेतर्फे यावर्षीचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार आॅर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानावरुन शिलेदार बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेविका नीलीमा खाडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होत्या.गायिका पोर्णिमा धुमाळे, नेपथ्यकार दत्ता गाडेकर, संगीत नाटक कलाकार राम साठ्ये, प्रकाश योजनाकार अनिल टाकळकर, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक ऋषी मनोहर यांना यंदाचे बालगंधर्व विशेष पुरस्कार देण्यात आले. शिलेदार म्हणाल्या, ‘बालगंधर्वांचे गायन ललित मधुर, जादुई होते. आजही संगीत नाटक म्हटल्यावर बालगंधर्व आठवतात, असा अव्दितीय लोकोत्तर बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ आॅर्गनवादक चंद्रशेखर यांना मिळतो तेव्हा अतिशय योग्य व्यक्तीचे कौतुक झाले अशीच भावना होते. महानगरपालिकेकडून अशाच उत्तमोत्तम कलकारांचा गौैरव व्हावा, असे वाटते.’चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, ‘बालपणी बालगंधर्वांचा सहवास लाभला. वडील हरिभाऊ देशपांडे यांच्यामुळे संगीत रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. नाट्यसंगीताचे विद्या दान ६५ वर्षे करता आले. बालगंधर्व गायकीच्या सेवेत आयुष्य वेचता आले याचे समाधान आहे. विद्यादानाचे काम अविरत सुरु ठेवणार आहे.’महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन, माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी मानपत्राचे वाचन आणि नीलिमा खाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :Puneपुणे