शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गेमचेंजर: दक्षिण पुण्यातील उंड्री येथे श्रीराम प्रॉपर्टीजच्या पहिल्या मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहतीचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:26 IST

Shriram Properties in Pune : श्रीराम प्रॉपर्टीजच्या संकल्पनेतून उंड्रीत आकार घेतेय दक्षिण पुण्याची पहिली मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहत

श्रीरामची दूरदृष्टी : उंड्रीचे दक्षिण पुण्याच्या पहिल्या मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहतीमध्ये (डाऊनटाऊन)  रूपांतर शांत उपनगर ते प्रमुख गुंतवणूक क्षेत्र – उंड्री हे पुण्याचं पुढचं मोठं पाऊल श्रीराम प्रॉपर्टीजच्या संकल्पनेतून उंड्रीत आकार घेतेय दक्षिण पुण्याची पहिली मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहत (डाऊनटाऊन)

 उंड्रीचे परिवर्तन – श्रीरामची दूरदृष्टी उभारत आहे दक्षिण पुण्याची मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहत श्रीराममुळे दक्षिण पुण्यातील मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहत म्हणून उंड्री उदयास येतेय गेम-चेंजर : श्रीराम प्रॉपर्टीजचा दक्षिण पुण्यातील पहिल्या मध्यवर्ती निवासी आणि व्यापारी वसाहतीचा प्रकल्प उंड्रीत सुरु

हिरवाईच्या कुशीत वसलेलं उंड्री – आता होतंय पुण्याचं नवं आकर्षण केंद्रदक्षिण पुण्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेलं उंड्री, आता शहरातील एक अत्यंत आश्वासक रिअल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून वेगाने उदयास येत आहे.उत्तम कनेक्टिव्हिटी, विकसित होत असलेली सामाजिक पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणात सुरु असलेले प्रकल्प – यामुळे एकेकाळचं हे शांत उपनगर आता पुण्याचं नवीन निवासी हॉटस्पॉट ठरत आहे. शहराच्या गतीशीलतेपासून दूर न राहता शांत जीवनशैलीची रंगत जपणं – यात उंड्रीचं आकर्षण दडलंय.

 नियोजनबद्ध आणि विचारपूर्वक रचना असलेल्या निवासी टाऊनशिप्सनं आज उंड्रीची ओळख बदलत आहे. त्यातच, श्रीराम प्रॉपर्टीजचा १४ एकरांमध्ये पसरलेला एक मिश्र-वापर प्रकल्प, उंड्रीच्या या बदलत्या स्वरुपाचा मुख्य भाग आहे. निवासी अपार्टमेंट्ससोबतच आकर्षक रिटेल आणि जीवनशैली सेवा असलेला हा प्रकल्प भविष्यातील पुण्याचे प्रमुख विकास केंद्र म्हणून आकारास येत आहे. हा प्रकल्प आधुनिक जीवनशैली, दैनंदिन सुविधा आणि नैसर्गिक सामुहिकतेचे संतुलन साधणारा आहे.

पुण्यातील रिअल इस्टेटचा प्रवास – एक झलकउंड्रीच्या वाढत्या महत्त्वाची खरी जाणीव करून घ्यायची असेल, तर पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाटचालीकडे नजर टाकावी लागेल.सन २००० च्या सुरुवातीस पुण्यातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर आणि डेक्कन हे भाग उच्चभ्रू विकासासाठी प्रसिद्ध होती. परंतु, हळूहळू या भागांत जागेची टंचाई जाणवू लागल्यावर, लक्ष वळलं पश्चिमेकडील हिंजवडी आणि पूर्वेकडील खराडी-मगरपट्टासारख्या परिघावरील भागांकडे. त्याला चालना मिळाली खास करून आयटी उद्योगामुळे. आज, पूर्व आणि मध्य पुणे दाटीवाटीचे आणि महाग झाल्यानंतर, अधिक सहज, परवडणारं आणि संभाव्य वृद्धी असलेलं स्थान बनलं ते उंड्री.

उंड्री आज इतकं आकर्षक का बनलंय?हडपसर, एनआयबीएम रोड आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (CBD) यांसारख्या विकसित भागांच्या जवळ असलेलं,  शहरातील मुख्य भागांशी पूर्णपणे जोडलेलं उंड्री हिरवळ टिकवून ठेवत शांततामय वातावरणात राहण्याची संधी देत आहे.मगरपट्टा सिटी किंवा एसपी इन्फोसिटीमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी उंड्री हा एक परिपूर्ण पर्याय बनतोय – गोंगाटापासून दूर, पण सोयीस्कर अंतरावर.द बिशप्स स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल आणि व्हिबग्योर हाय सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था तसेच रुबी हॉल क्लिनिक, शॉपिंग सेंटर, फिटनेस स्टुडिओ, कॅफे आणि उद्याने – यामुळे उंड्री ही कुटुंबांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी एक परिपूर्ण निवासस्थानाचं डेस्टिनेशन बनलं आहे .

पुणे मेट्रो: उंड्रीसाठी कनेक्टिव्हिटीचा नवा अध्यायमहा-मेट्रोच्या नवीन विस्तारीत प्रकल्पांतर्गत उंड्रीच्या कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे. रामवाडी ते पुणे विमानतळ (३किमी) आणि सिव्हिल कोर्ट ते येवलेवाडी (२० किमी) असा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून त्यात कोंढवा, एनआयबीएम आणि उंड्रीलाही जोडण्याची योजना आहे. त्यामुळे वाहतूक कमी होणार असून शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणंही सोपं होईल – जे उंड्रीला भविष्याच्या दृष्टीने सज्ज असं चांगला संपर्क असलेलं ठिकाण बनवेल.

गेम चेंजर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळपुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण पुण्यासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. त्यामुळे उंड्रीच्या विकासाच्या क्षमतेला आणखीच प्रोत्साहन मिळेल. पर्यटनाला चालना मिळून हा भाग नव्या उद्योगांना आकर्षित करेल. त्यामुळे परिसरातील निवासी मागणीत मोठी वाढ होईल. जास्तीत जास्त नोकऱ्यांच्या संधी आणि कमी वेळेत होणारा प्रवास यामुळे उंड्रीतील मालमत्तेच्या किमती स्थिरपणे वाढणार आहेत.

घर म्हणजे केवळ वास्तू नव्हे – जीवनशैलीचं स्वप्नघर हे केवळ छत नसतं. ते एक स्वप्न असतं. सुख, सुरक्षितता आणि निरंतर प्रगतीचं प्रतीक असतं.उंड्री हे स्वप्न पूर्ण करतं. आधुनिक जीवनशैली, उत्तम संपर्क आणि पुण्यातील जुन्या आणि दाटीवाटीच्या भागांच्या तुलनेत परवडणाऱ्या दरांमध्ये.

एकेकाळी बाणेर, वाकड आणि खराडी ज्या टप्प्यावर होते, तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आज उंड्री पोहोचले आहे. त्या भागांमध्ये प्रारंभी गुंतवणूक करणाऱ्यांच्या केवळ घरांचीच किंमत वाढली  नाही, तर त्यांच्या जीवनशैलीतही लक्षणीय सुधारणा झाली. विश्वासार्ह विकासकांसोबत आणि योग्य वेळी येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे आज उंड्री देखील त्याच वळणावर आहे.

श्रीराम प्रॉपर्टीज – विश्वासाचा भक्कम पाया

३७ अब्ज डॉलर्सच्या समूहाचा भाग असलेली, २५ वर्षांहून अधिक वारसा असलेली श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेड ही दक्षिण भारतातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी आहे. मध्यम आणि प्रीमियम हाऊसिंगवर विशेष भर देणाऱ्या या कंपनीच्या बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमधील प्रकल्पांचा श्रीराम प्रॉपर्टीजच्या व्यवसायात ८५ टक्के वाटा असून त्यात पुढचे डेस्टिनेशन असलेल्या पुणे शहराची भर पडत आहे.

३१,००० हून अधिक समाधानी ग्राहक, ४८ पूर्ण झालेले प्रकल्प, २५ दशलक्ष चौरस फुट विक्रीयोग्य क्षेत्राच्या माध्यमातून श्रीराम प्रॉपर्टीजने भारताच्या शहरी नकाशावर आपलं नाव ठसवलं आहे. कूल होम्ससोबतच्या संयुक्त विकासातून साकार होत असलेला उंड्रीमधील १४ एकराचा प्रकल्प म्हणजे श्रीरामच्या स्मार्ट प्लॅनिंग आणि जीवनशैली एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनाचा नवा, रोमांचक अध्याय ठरणार आहे.

उंड्री – पुण्याचं नवं डाऊनटाऊन. श्रीराम प्रॉपर्टीजसोबत गुंतवणुकीची योग्य वेळ.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग