शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गजा मारणे याला अटी शर्तीवर जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 22:47 IST

कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती.

पुणे : 'मकोका' गुन्ह्याच्या वैधतेबाबत उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय होईपर्यंत गजा मारणेने पुणे महापालिका हद्दीत प्रवेश करू नये, कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊन साक्षीदारांना धमकावू नये, अशा अटी- शर्तींवर एक लाख रुपयांच्या जातमुचलका व तितक्याच रकमेच्या हमीवर आरोपी गजानन मारणे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी जामीन मंजूर केला. मारणेने अॅड. सुधीर शहा आणि अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती. त्याची गंभीर दखल घेत कोथरूड पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी गजा मारणेला अटक केली. या प्रकरणी ३ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या गजा मारणेचा पहिला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मारणेने केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की या प्रकरणी तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असून, खुद्द तक्रारदारानेच प्रतिज्ञापत्र सादर करून आरोपी गजा मारणेचा गुन्ह्यातील सहभाग नाकारला आहे.या गुन्ह्यात आर्थिक लाभाचा फायद्याचा कोणताही उद्देश दिसत नसल्याने 'मकोका' अंतर्गत दाखल गुन्ह्याबाबतही वाजवी शंका निर्माण होत असून, याबाबतची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आधारावर न्यायालयाने गजा मारणे याची जामिनावर सुटका केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहाबाहेर आल्यानंतर गजा मारणेने पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली . 

English
हिंदी सारांश
Web Title : Gaja Marne Granted Bail with Conditions in Pune Case

Web Summary : Gaja Marne received conditional bail in a Pune 'MCOCA' case. He cannot enter Pune, threaten witnesses, and must provide a surety of ₹1 lakh. The court cited a pending high court petition and the complainant's denial of Marne's involvement as reasons.
टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस